Bigg Boss Marathi 3 | ‘महिला, महिला आणि भांडायला पहिला…’, सोनालीची तृप्ती देसाईंसोबत तूतू-मैमै!

घरात प्रवेश केल्याच्या पहिल्याच दिवशी स्पर्धक मीरा जगन्नाथ आणि स्नेहा वाघ आणि जय दुधाने यांच्यासोबत जुंपली होती. यानंतर आता स्पर्धक सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये जोरदार भांडण लागलेलं दिसलं.

Bigg Boss Marathi 3 | ‘महिला, महिला आणि भांडायला पहिला...’, सोनालीची तृप्ती देसाईंसोबत तूतू-मैमै!
Bigg Boss Marathi
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 4:02 PM

मुंबई : बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाचा ग्रँड प्रिमिअर 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता पार पडला आहे. आपल्या खास शैलीत ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची शाळा घेणारे दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहेत. ‘कलर्स मराठी’वरील या धमाकेदार रिअॅलिटी शोचे शानदार प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले होते. आता या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. यावेळी घरात पहिल्याच दिवसापासून वाद पाहायला मिळत आहेत.

घरात प्रवेश केल्याच्या पहिल्याच दिवशी स्पर्धक मीरा जगन्नाथ आणि स्नेहा वाघ आणि जय दुधाने यांच्यासोबत जुंपली होती. यानंतर आता स्पर्धक सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये जोरदार भांडण लागलेलं दिसलं.

‘महिला, महिला आणि भांडायला पहिला…’

‘बिग बॉस मराठी 3’च्या नव्या प्रोमोत सामाजिक कार्यकर्त्या आणि स्पर्धक तृप्ती देसाई, अभिनेत्री सोनाली पाटील हिला ‘माझ्याशी असं बोलायचं नाही, नीट बोलायचं’, असं चढ्या आवाजात म्हणताना दिसल्या. यानंतर सोनाली देखील त्यांच्याशी भांडताना दिसली. यावेळी तिने ‘महिला’ हा विषय उचलून धरला होता. या महिलांच्या हक्कांसाठी भांडतात आणि इथे महिलांवरच कुरघोडी करतात अशा आशयाचे बोल बोलत ‘महिला, महिला, महिला आणि भांडायला पहिला…’ असा खोचक टोला तृप्ती देसाई यांना लगावला.

पाहा प्रोमो :

मराठी मनोरंजन विश्वातील 15 चर्चित नाव या घरात नांदणार आहेत. विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी यंदा घरात प्रवेश केला आहे.

मीरामुळे वादाची ठिणगी

या वेळी बिग बॉसमराठी महिला विशेष थीमवर आधारित आहे. यामध्ये प्रत्येक महिला स्पर्धकाला घरातील एक जागेचा मालक घोषित करण्यात आले आहे. तर, प्रत्येक पुरुष स्पर्धकाला त्यांचे सेवक म्हणून काम करावे लागणार आहे. यात मीरा जगन्नाथ हिच्याकडे बेडरूमची जबाबदारी आली आहे. तर, ती घरात मी बेडरूमची मालकीण या आवेशात वावरत आहे. पुरुष स्पर्धक जय दुधाणे याने बेडवर ठेवलेला टॉवेल पाहून मीराने त्याला तो तिथून उचल असे म्हटले. यावरून त्या दोघांमध्ये चांगलीच जुंपली होती.

तर, दुसरीकडे अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्यावर किचनची जबाबदारी होती. यावेळी अन्न कमी पडल्याने मीराने तिला देखील बोल लावायला सुरुवात केली होती. यावेळी दोघींमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. या प्रसंगी स्नेहाला रडू कोसळलं होतं.

हेही वाचा :

Parineeti Chopra : व्हेकेशन मोड ऑन, परिणीती चोप्रा कुटुंबासोबत करतेय मालदीवची सफर

Love Story | आमिर खानसाठी आयोजित डिनर पार्टीमध्ये नागार्जुन झाले भावूक, पाहा नेमकं काय झालं…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.