Bigg Boss Marathi 3 | यावेळी ‘बिग बॉस मराठी’ असणार वेगळं! पाहा काय काय असतील घरातील नवे बदल

बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची नांदी झाली आहे. 19 सप्टेंबरला ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर होणार आहे. दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi 3 | यावेळी ‘बिग बॉस मराठी’ असणार वेगळं! पाहा काय काय असतील घरातील नवे बदल
बिग बॉस मराठी

मुंबई : बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची नांदी झाली आहे. 19 सप्टेंबरला ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर होणार आहे. दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘कलर्स मराठी’वर बिग बॉसचा शानदार प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात कोण दिसणार, याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे.

19 सप्टेंबरला संध्याकाळी सात वाजता ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर होणार आहे. त्यानंतर दररोज रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांना हा शो पाहता येणार आहे. शंभर दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातील 15 सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र बंदिस्त होतील. अनलॉक एंटरटेनमेंट अशी बिग बॉसच्या नव्या सिझनची थीम आहे. महेश मांजरेकर प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉसचं सूत्रसंचालन करतील की नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र प्रोमोमध्ये मांजरेकरांचं दर्शन घडल्याने चाहत्यांनाही दिलासा मिळाला आहे.

यावेळी घरात होणार मोठे बदल!

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे यावेळी ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात मोठे बदल दिसून येणार आहेत. कोरोना विषाणूवर आधारित काही तस्क यावेळी या घरातील स्पर्धकांना देण्यात येणार आहेत. केवळ मनोरंजनच नाही तर, यंदा स्पर्धक प्रेक्षकांना हात धुणे, मास्क वापरणे आणि सोशल डिस्टेंसिंग सारखे नियम समजावून लोकांचे प्रबोधन करणार आहेत. यासाठी स्पर्धकांना भन्नाट टास्क देण्यात येणार आहेत.

स्पर्धक होणार क्वारंटाईन

कोरोना महामारीमुळे यंदा स्पर्धकांना घराच्या आत जाण्यासाठी आधी या नियमांप्रमाणे 14 हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे. हा क्वारंटाईन कालावधी 14 ते 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे कळते आहे. तर यानंतर प्रत्येक स्पर्धकाला प्रीमिअर डान्ससाठी आणि त्याच्या तालमीसाठी काही दिवस देण्यात येणार आहेत. तर यावेळी या घराची थीम अंतराळ अर्थात स्पेसवर आधारित असणार आहे.

कोणाकोणाची नावं चर्चेत?

दरम्यान, ‘देवमाणूस’ मालिकेतील एसीपी दिव्या सिंहच्या भूमिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली अभिनेत्री नेहा खानपासून ‘अग्गंबाई सासूबाई’मुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची नावंही चर्चेत आहेत. अक्षया देवधर, संग्राम समेळ, पल्लवी सुभाष, रसिका सुनील, केतकी चितळे, चिन्मय उदगीरकर, ऋषी सक्सेना, नेहा जोशी, अंशुमन विचारे, किशोरी आंबिये यासारख्या कलाकारांनाही या शोसाठी विचारणा झाल्याचं बोललं जातं. लवकरच हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा :

Bigg Boss Marathi 3 | छोट्या पडद्यावरील ग्लॅमरस सूनबाई दिसणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरात?

Bigg Boss Marathi 3 Promo | ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची उत्सुकता संपली, मांजरेकरांनी शेअर केला प्रोमो

Bigg Boss Marathi 3 | नेहा खान, तेजश्री प्रधान ते ऋषी सक्सेना, ‘बिग बॉस मराठी 3’साठी चर्चेतील 15 नावं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI