Bigg Boss Marathi 3 | छोट्या पडद्यावरील ग्लॅमरस सूनबाई दिसणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरात?

'अवघाचि संसार' या मालिकेत अंतरा ही व्यक्तिरेखा अभिनेत्री दीप्ती देवीने साकारलेली होती. त्यानंतर 'अंतरपाट', 'मला सासू हवी' यासारख्या मालिकांमध्ये तिने मध्यवर्ती भूमिका साकारली.

Bigg Boss Marathi 3 | छोट्या पडद्यावरील ग्लॅमरस सूनबाई दिसणार 'बिग बॉस मराठी'च्या घरात?
Deepti Devi

मुंबई : बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. ‘बिग बॉस’च्या घरात कोण दिसणार, याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. प्रख्यात अभिनेत्री दीप्ती देवी (Deepti Devi) उर्फ दीप्ती श्रीकांत (Deepti Shrikant) ‘बिग बॉस’च्या तिसऱ्या सिझनमध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘मला सासू हवी’ (Mala Sasu Hawi) या मालिकेतील सूनेच्या व्यक्तिरेखेमुळे दीप्ती घराघरात लोकप्रिय झाली आहे.

35 वर्षींची दीप्ती श्रीकांत देवी ही मूळ गुजराती आहे. तिचा जन्म पुण्याचा. 2006 मध्ये दीप्तीने अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. ‘अवघाचि संसार’ या मालिकेत तिने साकारलेली अंतरा ही व्यक्तिरेखा गाजली होती. त्यानंतर ‘अंतरपाट’, ‘मला सासू हवी’ यासारख्या मालिकांमध्ये तिने मध्यवर्ती भूमिका साकारली.

 

View this post on Instagram

 

A post shared by D E E P T I D E V I (@deepti.devi)

मराठीसह हिंदी मालिकाही

‘पक पक पकाक’ या चित्रपटातून दीप्तीला मराठी सिनेमात ब्रेक मिळाला. ‘समर – एक संघर्ष’ या चित्रपटातील तिची भूमिकाही वेगळी ठरली. ‘परिवार – कर्तव्य की परीक्षा’, ‘बडे अच्छे लगते है’ या सारख्या हिंदी मालिकाही तिने केल्या आहेत. ‘कंडिशन्स अप्लाय- अटी लागू’, ‘पेज 4’, ‘मंत्र’ या सिनेमातही ती झळकली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘नाळ’ सिनेमातील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून गेली होती.

सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह

दीप्ती देवी ही उत्तम नृत्यांगना आहे. अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये तिने आपल्या डान्सची चुणूक दाखवली आहे. दीप्ती सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असून आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे एक लाख वीस हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे दीप्तीने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतल्यास ती ग्लॅमरचा तडका लावेल, यात शंका नाही.

दीप्ती देवीचा ट्रेडिशनल लूक :

 

View this post on Instagram

 

A post shared by D E E P T I D E V I (@deepti.devi)

‘बिग बॉस’च्या घरात सोज्वळ सूना

‘बिग बॉस मराठी’च्या प्रत्येक पर्वात छोट्या पडद्यावरील सोज्वळ सूनांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रींनी हजेरी लावली आहे. पहिल्या पर्वात जुई गडकरी, दुसऱ्या पर्वात वीणा जगताप झळकल्या होत्या. आता दीप्तीही त्यांची गादी चालवणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

कोणाकोणाची नावं चर्चेत?

दरम्यान, ‘देवमाणूस’ मालिकेतील एसीपी दिव्या सिंहच्या भूमिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली अभिनेत्री नेहा खानपासून ‘अग्गंबाई सासूबाई’मुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची नावंही चर्चेत आहेत. अक्षया देवधर, संग्राम समेळ, पल्लवी सुभाष, रसिका सुनील, केतकी चितळे, चिन्मय उदगीरकर, ऋषी सक्सेना, नेहा जोशी, अंशुमन विचारे, निशिगंधा वाड, किशोरी आंबिये यासारख्या कलाकारांनाही या शोसाठी विचारणा झाल्याचं बोललं जातं.

संबंधित बातम्या :

Bigg Boss Marathi 3 Promo | ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची उत्सुकता संपली, मांजरेकरांनी शेअर केला प्रोमो

Bigg Boss Marathi 3 | नेहा खान, तेजश्री प्रधान ते ऋषी सक्सेना, ‘बिग बॉस मराठी 3’साठी चर्चेतील 15 नावं

(Bigg Boss Marathi 3 Colors Marathi Reality Show Marathi Actress Deepti Devi among Possible Contestants List)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI