Bigg Boss Marathi 3 | सोनाली पाटीलनंतर ‘बिग बॉस मराठी’तून आणखी एका स्पर्धकाचे एलिमिनेशन

तिकीट टू फिनाले मिळवून विशाल निकम थेट महाअंतिम फेरीत पोहोचला आहे. मात्र मीनल शाह, विकास पाटील, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे या पाच जणांचा संघर्ष अजून संपलेला नाही.

Bigg Boss Marathi 3 | सोनाली पाटीलनंतर 'बिग बॉस मराठी'तून आणखी एका स्पर्धकाचे एलिमिनेशन
सौजन्य - बिग बॉस मराठी प्रोमो- स्क्रीनशॉट
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 3:55 PM

मुंबई : ‘बिग बॉस मराठी 3’ चा (Bigg Boss Marathi 3) शेवटचा आठवडा सुरु आहे. ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अभिनेत्री सोनाली पाटील (Sonali Patil) ‘बिग बॉस मराठी 3’च्या स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर उर्वरित स्पर्धक विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे ग्रँड फिनालेमध्ये गेल्याचा (Bigg Boss Marathi 3 Grand Finale) चाहत्यांचा समज झाला होता. मात्र कांटे की टक्कर अजून संपलेली नाही. कारण सोनालीला निरोप दिल्यानंतर सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी एक धक्कादायक घोषणा केली. ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात पहिल्यांदा मिड-वीक एलिमिनेशन घेण्यात येणार आहे. त्यानुसार आठवड्याच्या मध्यावधीत आणखी एक स्पर्धक बाद होणार आहे.

विशाल निकम ग्रँड फिनालेमध्ये

तिकीट टू फिनाले मिळवून विशाल निकम थेट महाअंतिम फेरीत पोहोचला आहे. मात्र मीनल शाह, विकास पाटील, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे या पाच जणांचा संघर्ष अजून संपलेला नाही. रविवारी ‘चावडी’ संपल्यानंतर या स्पर्धकांसाठी पुन्हा एकदा व्होटिंग लाईन्स सुरु झाल्या. पाचही जण नॉमिनेशनमध्ये असून त्यांच्यापैकी एका स्पर्धकाला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे.

बुधवारी एलिमिनेशनची चिन्हं

महेश मांजरेकर काही वेळा स्पर्धकांना घाबरवण्यासाठी टॅक्टिक्स वापरताना आपण पाहतो. एलिमिनेशनची भीतीही मांजेरकरांची अशीच एखादी टेक्निक असावी, असा सुरुवातीला प्रेक्षकांचा समज होता. मात्र एपिसोड संपताच व्होटिंग लाईन्स सुरु झाल्या. बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत मतदानाची मुभा आहे. म्हणजेच बुधवार किंवा गुरुवारच्या भागात यातील एका स्पर्धकाला नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. तर रविवार 26 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता ‘बिग बॉस मराठी 3’ चा ग्रँड फिनाले रंगणार आहे.

विजेत्याला वीस लाखांची रक्कम

यंदा ‘बिग बॉस मराठी 3’च्या विजेत्याला वीस लाखांची रक्कम मिळणार आहे. एलिमिनेशन टास्कसाठी सात जणांमध्ये 25 लाख ही विजेतेपदाची मूळ रक्कम विभागून देण्यात आली होती. सर्व स्पर्धकांनी चर्चा केल्यानंतर विशालला 12 लाख 50 हजार, मीनलला 6 लाख, विकासला 3 लाख 25 हजार, जयला 1 लाख 50 हजार, उत्कर्षला 1 लाख, सोनालीला 50 हजार तर मीराला 25 हजार अशा रकमांची पाटी गळ्यात टाकण्यास देण्यात आली होती. जे स्पर्धक नॉमिनेट होतील, त्यांच्याकडील पाटीवरील रक्कम विजेतेपदाच्या धनराशीतून कमी होणार होती.

मीनल कॅप्टन असल्याने तिला सर्वात आधी टाईमबॉम्ब देऊन स्पर्धकाला नॉमिनेट करण्याची संधी होती, त्यानुसार तिने सर्वात कमी रक्कम डोक्यावर असलेल्या मीराला नॉमिनेट केलं. मीराने सोनालीला, सोनालीने उत्कर्षला, तर उत्कर्षने विकासला व्होट दिलं. त्यामुळे हे चौघं जण नॉमिनेट झाले. तर त्यांच्या पाटीवर असलेली एकूण पाच लाखांची रक्कम वजा झाली. त्यामुळे यंदा ‘बिग बॉस मराठी 3’च्या विजेतेपदाला वीस लाखांची रक्कम मिळणार आहे.

विशाल, मीनल आणि जय हे तिघेही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. अर्थात विकास, मीरा आणि उत्कर्षही त्यांना टफ फाईट देऊ शकतात. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनची ट्रॉफी कोण उंचावणार, हे पुढच्याच रविवारी समजेल.

बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार पत्रकार परिषद, पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Bigg Boss Marathi 3 | Shocking! टिकटॉक स्टार सोनाली पाटील ‘बिग बॉस मराठी 3’मधून बाद?

मैत्रीसाठी काहीही..! पद्मिनीनं पळून जाऊन लग्न केल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीनं दिले दागिने

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.