Bigg Boss 16 | बिग बॉसने अर्चना गौतमला दिली मोठी शिक्षा, वाचा काय घडले?

बिग बॉस 16 चा सध्या तिसरा आठवडा सुरू आहे. शिव ठाकरे हा बिग बॉसच्या घरातील कॅप्टन आहे.

Bigg Boss 16 | बिग बॉसने अर्चना गौतमला दिली मोठी शिक्षा, वाचा काय घडले?
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 7:40 AM

मुंबई : रिअॅलिटी शो बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मधून प्रेक्षकांना जबरदस्त असे मनोरंजन होत आहे. श्रीजिता डे काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलीये. मात्र, श्रीजिता बाहेर बिग बॉस (Bigg Boss) खेळत आहे. घरातील सदस्यांवर आरोप करणे असो किंवा निर्मात्यांवर काही भाष्य करणे असो हे सातत्याने घराच्या बाहेर येऊन श्रीजिता करताना दिसत आहे. गोरी आणि श्रीजिताचा मोठा वाद (Dispute) घरामध्ये झाला होता, त्यावेळी श्रीजिताने गोरीचा क्लास काढला होता. त्यानंतर घराचा त्यावेळीचा कॅप्टन गाैतमने श्रीजिताला दोषी ठरवत नाॅमिनेशनमध्ये टाकले होते.

बिग बॉस 16 चा सध्या तिसरा आठवडा सुरू आहे. शिव ठाकरे हा बिग बॉसच्या घरातील कॅप्टन आहे. मात्र, प्रियंकाला कॅप्टन व्हायचे असल्याने प्रियंकाने शिवला त्रास देण्यासाठी मोर्चा सुरू केलाय. यामध्ये नेहमीप्रमाणेच अर्चनाने देखील उडी घेतलीये. या दोघी  बिग बॉस घरात सतत झोपत आहेत, इतकेच नाही तर प्रियंका आपले काम देखील व्यवस्थित करताना दिसत नाहीये.

घराच्या कॅप्टनने प्रियंका आणि अर्चनाला झोपू नका आणि त्यांना अनेकदा उठवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, प्रियंका आणि अर्चनाने आपली मनमर्जी करणे सोडले नसल्याने बिग बाॅसने या दोघींना शिक्षा देण्याचा आदेश दिला. त्यानंतर स्वत: बिग बाॅसने अर्चनाला शिक्षा देत 24 तासांसाठी तिला घराचा कॅप्टन बनवले आहे.

बिग बाॅसने घराचा कॅप्टन आपल्याला बनवल्याने अर्चनाचा आनंद गगणात मावत नव्हता. मात्र, बिग बाॅसने तिला सांगितले की, ही तुझ्यासाठी शिक्षा आहे. मात्र, तरीही अर्चनाला काहीच फरक पडला नाही. अर्चनाला कॅप्टन बनवल्यामुळे तिच्या विरोधात सर्व घरातील सदस्य झाल्याचे चित्र देखील बघायला मिळाले.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.