कपिल शर्मा शो बंद होताच स्टार प्लसचा ‘कॉमेडी अड्डा’, रणवीर सिंह सारख्या अनेक दिग्गजांची मांदियाळी

'द कपिल शर्मा शो' बंद होताच 'स्टार प्लस'ने 'कॉमेडी अड्डा' नावाचा नवा कोरा कॉमेडी शो आणला आहे (Comedy Adda new show start on star plus)

कपिल शर्मा शो बंद होताच स्टार प्लसचा 'कॉमेडी अड्डा', रणवीर सिंह सारख्या अनेक दिग्गजांची मांदियाळी

मुंबई : ‘द कपिल शर्मा शो’ बंद होताच ‘स्टार प्लस’ने ‘कॉमेडी अड्डा’ नावाचा नवा कोरा कॉमेडी शो आणला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अभिनेता रणवीर सिंह, भुवन बाम, नुसरत भरुचा, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह सारखे दिग्गज सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर आरजे नावेद या कार्यक्रमाला होस्ट करत आहे. कपिल शर्माचे देशभरात लाखो चाहते आहेत. मात्र, कपिल शर्मा शो बंद असल्याने त्या कार्यक्रमाचा प्रेक्षकवर्ग या कार्यक्रमाकडे वळण्याची शक्यता आहे (Comedy Adda new show start on star plus).

‘कॉमेडी अड्डा’ हा कार्यक्रम सध्यातरी फक्त सहा आठवड्यांसाठी असणार आहे. दर रविवारी रात्री साडेदहा वाजता हा कार्यक्रम स्टार प्लस वाहिनीवर प्रक्षेपित होईल. काल या कार्यक्रमालाचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर या कार्यक्रमाचे एपिसोड पुढे वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.

कार्यक्रमात दिग्गजांची मांदियाळी

या कार्यक्रमात अनेक दिग्गज सहभागी झाले आहेत. रेडिओवर ‘मिर्ची मुर्गा’ने प्रसिद्ध असलेला आरजे नावेद हा या कार्यक्रमाला होस्ट करत आहे. त्याच्यासोबत कार्यक्रमात रणवीर सिंह, भुवन बाम, हरभजन सिंह, नुशरत भरुचा, अपारशक्ती खुराना, विजय वर्मा, निधि सिंह आणि सुमित यांसारखे अनेक प्रसिद्ध दिग्गज आहेत.

या कार्यक्रमाच्या प्रत्येक एपिसोडमध्ये ‘स्टॅण्ड-अप ओरिजनल्स’ नावाची एक विशिष्ट सेगमेंट आहे. यामध्ये अनेक लोकप्रिय कॉमेडियन्स सहभागी होतात. खरंतर टीव्हीवर हा एक स्टॅण्ड-अप कॉमेडीचा नवा अवतार आहे (Comedy Adda new show start on star plus).

कपिल शर्मा शो बंद

भारतातील लोकप्रिय शोपैकी एक असणारा ‘द कपिल शर्मा’ (The Kapil Sharma Show’) 31 जानेवारीपासून बंद झाला आहे. 1 फेब्रुवारीला शो टिव्हीवर दाखवण्यात आला नाही. याबद्दल ‘द कपिल शर्माच्या शोमधील कलाकारांनी अगोदरच कल्पना दिली होती. मात्र, प्रेक्षकांकडून निरोप घेताना कपिलने कोणताही फिनाले ठेवला नाही यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. परंतू असेही सांगितले जात आहे की हा शो परत एकदा टीव्हीवर येऊ शकतो. पण यामध्ये शोचे जुनेच भाग दाखवले जातील. कपिलच्या शो अचानक बंद झाल्यामुळे बरेच प्रश्नही निर्माण झाले आहेत. दरम्यान, एका चाहत्याने कपिलला शो बंद होण्याचे कारण विचारले होते, त्यावेळी कपिल म्हणाला होता की, लवकरच आम्ही पुन्हा एकदा पालक बनणार आहोत त्यामुळे मला माझ्या पत्नीला वेळ द्यायचा आहे.

हेही वाचा : Photo : ‘मुलींना गुलाबाचं फूल मिळाल्यावर..’, निया शर्माची खास पोस्ट

Published On - 3:21 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI