
टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा दलजीत कौर ही लग्न बंधनात अडकणार आहे. चाहते दलजीत कौर हिचे अभिनंदन करताना दिसत आहेत.

शालिन भनोट याच्यासोबत काही वर्षांपूर्वीच दलजीत कौर हिने घटस्फोट घेतलाय. आता ती दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. आता अभिनेत्रीच्या मेहंदी कार्यक्रमातील काही फोटो पुढे आले आहेत.

दलजीत कौर हिने तिच्या इंस्टाग्रामवर मेहंदी कार्यक्रमातील फोटो शेअर केले आहेत. दलजीत कौर हिच्या हातावरील मेहंदी अत्यंत खास दिसत असून अभिनेत्री खूप आनंदामध्ये दिसत आहे.

या मेहंदीमध्ये दलजीत कौर हिचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. चाहत्यांना दलजीत कौर हिची ही मेहंदी प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. नव्या आयुष्यासाठी चाहते हे दलजीत कौर हिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

दलजीत कौर हिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिचे आई वडील दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये तिचा मुलगा देखील दिसत आहे. तिचा मुलगा आईच्या हातावरील मेहंदी प्रेमाने बघत असल्याचे दिसत आहे.