Happy Birthday Avika Gor | लॉकडाऊन दरम्यान स्लीमट्रीम होत चाहत्यांना दिलं सरप्राईज, बोल्ड लूकने लक्ष वेधून घेतेय अविका गौर!

अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) हिने ‘बालिका वधू’ची ‘आनंदी बहू’ बनून सर्वांची मने जिंकली होती. ‘जग्ग्या’शी लढा देण्याची आणि आपल्या निरागस शब्दांनी भल्याभल्यांना मोठा धडा देण्याची तिची शैली चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.

Happy Birthday Avika Gor | लॉकडाऊन दरम्यान स्लीमट्रीम होत चाहत्यांना दिलं सरप्राईज, बोल्ड लूकने लक्ष वेधून घेतेय अविका गौर!
अविका गौर

मुंबई : अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) हिने ‘बालिका वधू’ची ‘आनंदी बहू’ बनून सर्वांची मने जिंकली होती. ‘जग्ग्या’शी लढा देण्याची आणि आपल्या निरागस शब्दांनी भल्याभल्यांना मोठा धडा देण्याची तिची शैली चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. आविकाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. या शोमधून ती घरोघरी ओळखली जाऊ लागली. ‘बालिक वधू’ची ही छोटी आनंदी आता मोठी झाली आहे आणि सोशल मीडियावर सतत आपले फोटो शेअर करत असते (Happy Birthday Avika Gor know about actress weight loss journey).

अविका आज (30 जून) तिचा 24वा वाढदिवस साजरा करत आहे. अविकाचा जन्म 30 जून 1997 रोजी मुंबई येथे झाला होता. अलीकडेच, अविकाने तिच्या ट्रांसफॉर्मेशनने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये अविकाने 13 किलो वजन कमी केले. सोशल मीडियावर आपल्या वजन कमी झालेले ट्रांसफॉर्मेशन फोटो शेअर करुन तिने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. तिने साडीतले सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती.

अविकाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले होते की, एका रात्री जेव्हा तिने स्वत:ला आरशात पाहिले तेव्हा ती अक्षरशः ओरडली. ती म्हणाली, मी जशी दिसत होते आधी तशी नव्हते. मोठे हात, पाय, पोट थायरॉईड किंवा पीसीओडी सारख्या इतर आरोग्य स्थितीमुळे हे असते तर, समजण्याजोगे झाले असते. कारण ते नियंत्रणाबाहेर असू शकते, परंतु माझ्यासोबत हे घडत होते, कारण मी काहीही खात होते आणि कसरतही करत नव्हते.

पाहा अविकाचे फोटो :

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

काहीही विचार करू शकत नव्हते!

या सगळ्याचा असा परिणाम झाला की, मी स्वतःचीच नावडती झाले. माझ्या रूपांबद्दल माझ्या मनात गोंधळ सुरु झाला. एक दिवस मी विचार करून थेट निर्णय घेतले होते आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. कसरत, योग्य आहाराच्या मदतीने माझे वजन कमी झाले.

वजन कमी झाल्यानंतर आता अविका सोशल मीडियावर आपली हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत राहते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. तिची पोस्ट येताच, तिचे प्रत्येक फोटो व्हायरल होतात. अविकाही तिच्या रिलेशनशिपमुळे देखील बरीच चर्चेत राहिली आहे. ती मिलिंद चांदवानीला डेट करत आहे आणि त्याच्याबरोबर इन्स्टाग्रामवर पोस्ट्स शेअर करत असते. वर्क फ्रंट बद्दल बोलायचे तर, अविकाचा म्युझिक व्हिडीओ ‘दिल को मेरे’ नुकताच प्रदर्शित झाला होता. जो खूप पसंत केला गेला. हे गाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

(Happy Birthday Avika Gor know about actress weight loss journey)

हेही वाचा :

Avika Gor | ‘बालिका वधू’चा ग्लॅमरस अंदाज, 13 किलो वजन घटवलं, अविका गौर ओळखूही येईना

Avika Gor | लग्नाविनाच ‘बालिका वधू’ 18 वर्षांनी मोठ्या सहकलाकाराच्या बाळाची आई?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI