Happy Birthday Dipika Kakar: शोएबशी लग्नासाठी दीपिका कक्कर बनली ‘फैजा’, इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर झाली होती चर्चा

ससुराल सिमर का या मालिकेदरम्यान दीपिका आणि शोएबची भेट झाली. शोएबने ऑनस्क्रीन तिच्या पतीची भूमिका साकारली होती. मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे डेट केल्यानंतर दोघांनीही लग्नगाठ बांधली.

Happy Birthday Dipika Kakar: शोएबशी लग्नासाठी दीपिका कक्कर बनली 'फैजा', इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर झाली होती चर्चा
Dipika Kakar
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Aug 06, 2022 | 8:55 AM

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्करने (Dipika Kakar) अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ससुराल सिमर का (Sasural Simar Ka) या मालिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. सलमान खानच्या बिग बॉस 12 ची ती विजेतीदेखील ठरली आहे. दीपिकाने 2018 मध्ये टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिमसोबत (Shaoib Ibrahim) लग्न केलं. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दीपिकाने 2011 मध्ये ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत काम करत असताना तिचं रौनक सॅमसनशी लग्न झालं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. तीन वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर दीपिका शोएबच्या प्रेमात पडली.

ससुराल सिमर का या मालिकेदरम्यान दीपिका आणि शोएबची भेट झाली. शोएबने ऑनस्क्रीन तिच्या पतीची भूमिका साकारली होती. मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे डेट केल्यानंतर दोघांनीही लग्नगाठ बांधली. 22 फेब्रुवारी 2018 रोजी दीपिकाने इस्लाम धर्म स्वीकारत शोएबशी लग्न केलं. सुरुवातीला दीपिकाने धर्मांतराची बाब लपवून ठेवली होती. पण नंतर जेव्हा ही बातमी माध्यमांसमोर आली तेव्हा दीपिकाने स्वतः पुढे येऊन ते मान्य केलं. त्यानंतरही दीपिकाला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. लग्नादरम्यान दीपिकाने तिचं नाव बदलून फैजा ठेवलं.

शोएब इब्राहिमशी लग्न केल्यानंतर सहा महिन्यांनी दीपिका कक्करने बिग बॉसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. बिग बॉसमध्ये दीपिकाची प्रतिमा अतिशय संयमी स्पर्धक अशी होती आणि याच कारणामुळे ती बिग बॉसची विजेतीही ठरली. मूळची पुण्याची असलेली दीपिका नोकरीच्या निमित्ताने 2006 मध्ये मुंबईत आली होती. 2010 मध्ये दीपिकाला NDTV Imagine वर ‘नीर भरे तेरे नैना देवी’मध्ये भूमिका मिळाली. दीपिकाने ससुराल सिमर का या मालिकेव्यतिरिक्त अगले जनम मोहे बिटिया ही किजो, कयामत की रात आणि कहां हम कहाँ तुम या मालिकांमध्ये काम केलं. तिने पलटन या बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें