Happy Birthday Saurabh Raj Jain | भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेने मिळवून दिली ओळख, हॉलिवूड चित्रपटातही झळकलाय सौरभ जैन!

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो महाभारतमध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता सौरभ राज जैन याचा आज वाढदिवस आहे. सौरभ राज जैन (Saurabh Raj Jain) याला प्रेक्षक टीव्हीचा कृष्ण म्हणूनच ओळखतात.

Happy Birthday Saurabh Raj Jain | भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेने मिळवून दिली ओळख, हॉलिवूड चित्रपटातही झळकलाय सौरभ जैन!
Saurabh Raj Jain

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो महाभारतमध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता सौरभ राज जैन याचा आज वाढदिवस आहे. सौरभ राज जैन (Saurabh Raj Jain) याला प्रेक्षक टीव्हीचा कृष्ण म्हणूनच ओळखतात. त्याचे हे पात्र महाभारत या मालिकेत खूप पसंत केले गेले होते.  या व्यक्तिरेखेमुळे आज तो प्रत्येक घरात ओळखला जातो. सौरभ राज जैन याने याआधी अनेक टीव्ही शोमध्ये काम केले असले, तरी त्याला ओळख मिळाली ती महाभारतातील कृष्णाच्या भूमिकेतून.

‘कृष्णा’च्या या व्यक्तिरेखेने तो लोकांच्या हृदयात अशा रीतीने स्थिरावला, की त्याला ती ओळख आता कधीच मागे सोडता येणार नाही. सौरभ राज जैन यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला त्याच्या काही खास गोष्टी सांगणार आहोत.

एकाच नव्हे अनेक मालिकांमध्ये साकारला कृष्ण!

सौरभ राज जैन यांनी आपल्या करिअरची सुरुवात रिमिक्समधून केली होती. यानंतर त्याला पौराणिक मालिकांमध्ये काम मिळू लागले. महाभारतातील कृष्णाच्या भूमिकेमुळे सौरभ राज जैन बराच काळ टाईपकास्ट झाला आहे. त्याला एकाच नव्हे तर अनेक पौराणिक शोमध्ये ‘कृष्ण’ म्हणून काम मिळाले होते.

मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात

अभिनेता सौरभ राज जैन याने 2004 साली मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. यानंतर तो रिमिक्स शोमध्ये दिसला. यानंतर सौरभने ‘कसम से’ आणि ‘मीत मिला दे रब्बा’मध्ये काम केले. त्याला ‘जय श्री कृष्ण’ या टीव्ही शोमध्ये भगवान विष्णूची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, जिथून त्याच्या करिअरला एक मार्ग मिळू लागला. यानंतर सौरभला ‘देवो के देव महादेव’मध्ये भगवान विष्णूची भूमिका साकारायला मिळाली.

यानंतर त्याला महाभारतात ‘कृष्णा’ची भूमिका मिळाली, त्यामुळे तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. आजमितीला सौरभ राज जैन याला लोक फक्त कृष्णाच्या भूमिकेमुळे ओळखतात. या पात्रातून बाहेर पडायला त्याला बराच वेळ लागला. या व्यक्तिरेखेपासून प्रत्येक दिग्दर्शकाला त्याला याच भूमिकेत पाहायचे होते.

हॉलिवूड चित्रपटात केलेय काम

सौरभ राज जैन याने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘कर्मा’ या हॉलिवूडपटातून त्याने चित्रपट प्रवासाला सुरुवात केली होती. या चित्रपटामध्ये तो क्लॉडिया सिसेलाच्या बॉयफ्रेंडच्या भूमिकेत होता. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही त्याचा हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. याशिवाय त्यांनी ‘चेक इन बँकॉक’ या इंडोनेशियन चित्रपटातही काम केले आहे. सौरभ राज जैन याने 2017 मध्ये रिद्धिमा जैनसोबत लग्न केले. त्यांना ऋशिव आणि ऋषिका अशी दोन जुळी मुले आहेत.

हेही वाचा :

सुबोध भावेंसोबत काम करतानाचा अनुभव खास, ‘विजेता’ फेम अभिनेता गौरीश शिपुरकरने व्यक्त केल्या भावना!

Video | ‘हिला कोणी तरी आवरा रे…’, विदेशी अभिनेत्रीला कॉपी करण्याच्या नादात उर्फी जावेदने परिधान केला फॉईल पेपर ड्रेस!


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI