Video | ‘हिला कोणी तरी आवरा रे…’, विदेशी अभिनेत्रीला कॉपी करण्याच्या नादात उर्फी जावेदने परिधान केला फॉईल पेपर ड्रेस!

आपल्या हटके आणि लक्षवेधी आऊटफिटमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आली आहे. नुकतीच ही अभिनेत्री अशा ड्रेसमध्ये दिसली, ज्याने सर्वांचेच डोळे पांढरे झाले.

Video | ‘हिला कोणी तरी आवरा रे...’, विदेशी अभिनेत्रीला कॉपी करण्याच्या नादात उर्फी जावेदने परिधान केला फॉईल पेपर ड्रेस!
Urfi Javed

मुंबई : आपल्या हटके आणि लक्षवेधी आऊटफिटमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आली आहे. नुकतीच ही अभिनेत्री अशा ड्रेसमध्ये दिसली, ज्याने सर्वांचेच डोळे पांढरे झाले. उर्फी जावेद फॉईल पेपरने असा काही ड्रेस तयार केला की, पाहणारे लोकही चाट पडले आहेत.

उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती फॉईल पेपरमध्ये गुंडाळलेली दिसत आहे. म्हणजे यावेळी तिने तिचा आऊटफिट चक्क किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या फॉईल पेपरचा वापर केला आहे. एवढेच नाही तर, त्याच फॉईल पेपरने तिने डोक्याचा मुकुटही बनवला आहे. उर्फिचा हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकानेच ‘हिला आवरा रे..’ असं म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

रिहानाला केलंय कॉपी

आपल्या आउटफिट्समुळे चर्चेत असलेल्या उर्फी जावेदने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने केंडल जेनर आणि बेला हदीद सारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींची कॉपी केली होती. आता पॉप स्टार रिहानाला देखील तिने कॉपी केलं आहे. होय, उर्फीने यावेळी रिहानाचा मेट गाला लुक कॉपी केला आहे. फरक एवढाच आहे की, उर्फीने तिचा आउटफिट अधिक मनोरंजक बनवण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईलचा वापर केला आहे.

लोकांनी केलं ट्रोल

जिथे अनेक चाहते उर्फी जावेदचा हा व्हिडीओ पसंत करत आहेत. त्याचबरोबर अनेकजण तिला याबद्दल ट्रोल करत आहेत. अनेकजण यावर कमेंट्सही करत आहेत. बरेच वापरकर्ते उर्फीला तिच्या डिझायनरबद्दल विचारत आहेत, जो तिचे असे ड्रेस बनवतो. त्याचवेळी अनेकांनी असे ड्रेस का घालावेत असे लिहिले. त्याच वेळी, एकाने लिहिले की ‘तिने काय घातले आहे त्याची गरज काय आहे…’ या व्हिडीओला अल्पावधीत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

रिलेशनशिपमुळेही चर्चेत!

अलीकडेच उर्फी जावेदने तिच्या एक्सबद्दल खुलासा केला. उर्फी जावेदने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने तिचा माजी प्रियकर पारस कालनावतमुळे टीव्ही शो अनुपमा गमावला होता. उर्फीने पारससोबतच्या नात्याला बालपणात झालेली चूक म्हटले होते. ती म्हणाली होती, मी याला नाते मानत नाही. ही लहानपणी झालेली चूक होती. मला एका महिन्यात ब्रेकअप करायचेच होते.

हेही वाचा :

Video | सारा अली खानची बडदास्त ठेवण्याच्या नादात बॉडीगार्डचा ‘पापाराझी’ला धक्का, पाहा अभिनेत्रीने पुढे काय केलं…

This Week on OTT | खून, चोरी, दरोडा आणि सस्पेन्सने भरलेला असणार येता आठवडा, पाहा कोणत्या सीरीज-चित्रपट रिलीज होणार?

Video | बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला! ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी ‘भाईजान’ साबरमती आश्रमात


Published On - 4:01 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI