Happy Birthday Urvashi Dholakia | वयाच्या 6व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण, अवघ्या 19व्या वर्षी जुळ्या मुलांची आई, वाचा उर्वशी ढोलकियाबद्दल…

‘कसौटी जिंदगी की’ फेम कोमोलिका, म्हणजेच उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) आज, 9 जुलै 2021 रोजी 42 वर्षांची झाली आहे. गेल्या 28 वर्षांपासून उर्वशी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. उर्वशी केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर, एक सुंदर नर्तकी देखील आहे.

Happy Birthday Urvashi Dholakia | वयाच्या 6व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण, अवघ्या 19व्या वर्षी जुळ्या मुलांची आई, वाचा उर्वशी ढोलकियाबद्दल...
उर्वशी ढोलकिया

मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम कोमोलिका, म्हणजेच उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) आज, 9 जुलै 2021 रोजी 42 वर्षांची झाली आहे. गेल्या 28 वर्षांपासून उर्वशी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. उर्वशी केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर, एक सुंदर नर्तकी देखील आहे. 42 वर्षांच्या उर्वशीने वयाच्या 19व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला. चला तर मग जाणून घेऊया तिच्याबद्दल अशा काही खास गोष्टी, ज्या कदाचित तुम्हाला आतापर्यंत ठाऊक नसतील…(Happy Birthday Urvashi Dholakia know about actress life story)

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतल्या ‘कोमोलिका’च्या व्यक्तिरेखेसाठी उर्वशीला 5 पुरस्कार मिळाले. फारच थोड्या लोकांना माहिती आहे की, वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी उर्वशी ढोलकियाने कॅमेर्‍यावर डेब्यू केला होता. तिने दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री रेवती यांच्यासमवेत लक्स साबणची जाहिरात केली होती. उर्वशीने 1988मध्ये ‘कब तक चप राहुंगी’ या मालिकेतून बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरवात केली. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी ती नादिया बब्बर यांच्या संयुक्त नाट्यगटामध्ये सामील झाली.

दोन वर्ष एकत्र राहिल्यानंतर पतीपासून विभक्त झाली!

वयाच्या 14व्या वर्षी ‘देख भाई देख’ या मालिकेत उर्वशीला एक गमतीदार पात्र ऑफर केले गेले. प्रेमात पडल्यावर आणि वयाच्या 16व्या वर्षी लग्न झाल्यावर उर्वशी तिच्या कारकीर्दीची उंची गाठत होती. दुर्दैवाने, उर्वशीचे लग्न फार काळ टिकले नाही आणि वयाच्या 18व्या वर्षी ती पतीपासून विभक्त झाली. त्या काळात ती गर्भवती होती. जेव्हा, ती 19 वर्षांची होती, तेव्हा तिने क्षितीज आणि सागर या जुळ्या मुलांना जन्म दिला. सिंगल मदर बनून उर्वशीने एकटीने आपल्या मुलांचे संगोपन केले.

उर्वशी कॉलेजला जाऊ शकली नाही!

उर्वशीने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. परंतु, लहान वयातच तिचे लग्न झाल्यामुळे ती महाविद्यालयात जाऊ शकली नाही. एकता कपूरची मालिका ‘कसौटी जिंदगी की’मध्ये ‘कोमोलिका’ म्हणून उर्वशीने तिच्या कारकिर्दीतील दुसर्‍या इनिंगची भूमिका साकारली, जी आतापर्यंत प्रेक्षकांची आवडती दूरदर्शन व्हँप ठरली. कसौटीनंतर उर्वशीला ‘बिग बॉस’ची ऑफर देण्यात आली आणि हा शो जिंकून तिने पुन्हा एकदा सिद्ध केले की टीव्हीची सून असण्यासोबतच लोक या गोड व्हँपवर भरपूर प्रेम करतात.

(Happy Birthday Urvashi Dholakia know about actress life story)

हेही वाचा :

Happy Birthday Sangeeta Bijlani : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड, 60व्या वर्षीही सौंदर्याच्याबाबतीत नव्या अभिनेत्रींना टक्कर, वाचा संगीता बिजलानीविषयी…

PHOTO | अभिनेत्री अमायारा दस्तूरच्या सौंदर्यावर फिदा झाली ब्युटी प्रोडक्ट कंपनी, ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी लागली वर्णी!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI