जेव्हा राणादा पाठकबाईंबद्दल म्हणाला ‘याच्याही जरा पल्याडच आहे आमचं’; 2 वर्षांपूर्वीच दिली प्रेमाची कबुली

हार्दीकने (Hardeek Joshi) जवळपास दोन वर्षांपूर्वीच अक्षयावरील प्रेमाची कबुली दिली होती. त्याची ही जुनी पोस्ट आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. मालिका संपल्यानंतर हार्दीकने अक्षयाला प्रपोज केलं.

जेव्हा राणादा पाठकबाईंबद्दल म्हणाला याच्याही जरा पल्याडच आहे आमचं; 2 वर्षांपूर्वीच दिली प्रेमाची कबुली
अक्षया देवधर आणि हार्दीक जोशी
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 06, 2022 | 12:57 PM

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे अभिनेता हार्दीक जोशी (Hardeek Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar). मंगळवारी या दोघांनी सोशल मीडियावर साखरपुड्याचे (engagement) फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. ठाण्यात कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा साखरपुडा पार पडला. हार्दीक आणि अक्षया हे त्यांच्या नात्याबद्दल कधीच व्यक्त न झाल्याने अनेकांसाठी त्यांचा साखरपुडा हा आश्चर्याचा धक्का होता. ‘हे एखाद्या मालिकेसाठी आहे की खरंच तुमचा साखरपुडा झाला’, असाही प्रश्न काही नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये विचारला. मात्र हार्दीकने जवळपास दोन वर्षांपूर्वीच अक्षयावरील प्रेमाची कबुली दिली होती. त्याची ही जुनी पोस्ट आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.

‘पडद्यावरची सोज्वळ केमिस्ट्री नि पडद्यामागची निखळ मैत्री. याच्याही जरा पल्याडच आहे आमचं “Strong Bonding”‘, असं कॅप्शन देत हार्दीकने अक्षयासोबतचा हा सेल्फी पोस्ट केला होता. डिसेंबर 2019 मधील ही पोस्ट असून त्यावर आता नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

पहा फोटो-

“तुझ्यात जीव रंगला ही मालिका पाच वर्षे चालली. याच मालिकेदरम्यान आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. आम्ही एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे ओळखू लागलो होतो. अक्षया ही माझ्यासाठी परफेक्ट जोडीदार आहे. मालिका संपल्यानंतर मी तिला प्रपोज केलं आणि तिने त्याला होकार दिला. एक व्यक्ती म्हणून ती खूप चांगली आहे आणि माझ्यापेक्षा ती खूपच समजंस आहे”, अशा शब्दांत हार्दीकने भावना व्यक्त केल्या.