Praveen Kumar Sobti Passed Away : महाभारतात भिमाची भूमिका साकारणारे अभिनेते, अ‍ॅथलिट प्रविण कुमार सोबती यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Feb 08, 2022 | 10:58 AM

महाभारत या मालिकेत भीम ही भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Praveen Kumar Sobti Passed Away : महाभारतात भिमाची भूमिका साकारणारे अभिनेते, अ‍ॅथलिट प्रविण कुमार सोबती यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रविण कुमार सोबती
Follow us on

Praveen Kumar Sobti Passed Away : महाभारत (Mahabharat) या मालिकेत भीम ही भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti Passed Away) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रवीण कुमार यांच्या जाण्याने एक चांगला कलाकार आपण गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. नुकतंच गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं. त्यापाठोपाठ आता प्रवीण कुमार यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. प्रवीण कुमार सोबती यांनी महाभारत मालिकेत साकारलेली भीम भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. शिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ते उत्तम अॅथलिटदेखील आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी 4 पदकांची कमाई केली आहे. तसंच ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्वदेखील केलं आहे.

कलाकार प्रवीण कुमार सोबती

प्रवीण कुमार सोबती महाभारत या मालिकेत भीम ही भूमिका ज्यापद्धतीने साकारली त्यामुळे त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं. प्रवीण कुमार सोबती यांनी अनेक सिनेमे देखील केले आहेत. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘शहेनशाह’ चित्रपटात काम केलं. या चित्रपटातील मुख्तार सिंग ही त्यांची भूमिका लोकप्रिय ठरली. याशिवाय ‘करिश्मा कुदरत का’, ‘युद्ध’, ‘जबर्द’, ‘खुदगर्ज’, ‘लोहा’, ‘मोहब्बत के दुश्मन’, ‘इलाका’ या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

खेळाडू प्रवीण कुमार सोबती

प्रवीण कुमार जितके चांगले अभिनेते होते तितकेच ते उत्तम खेळाडू होते. त्यांनी 4 वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची कमाई केली. त्यांनी 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक आपल्या नावे केले. या शिवाय त्यांनी 2 वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांच्या खेळातील चमकदार कामगिरीसाठी त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे . त्यांनी 30 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

प्रवीण कुमार सोबती यांचं आजारपण

प्रवीण कुमार सोबती यांची तब्येत मागच्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यांना मणक्याचा त्रास होत होता. प्रवीण कुमार यांच्या जाण्याने सध्या बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

Birthday Special : बिकनीपासून लेहंग्यापर्यंत इशिता राज शर्माच्या बोल्ड लूकने चाहते घायाळ, पाहा खास फोटो!

Khiladi Trailer : रवी तेजाच्या ‘खिलाडी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अॅक्शन आणि कॉमेडीचा जोरदार तडका!

कपिल-अक्षयच्या दोस्तीत कुस्ती; ‘बच्चन पांडे’च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार कपिल शोमध्ये जाणार नाही, दगाबाजी केल्याचा आरोप