AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपिल-अक्षयच्या दोस्तीत कुस्ती; ‘बच्चन पांडे’च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार कपिल शोमध्ये जाणार नाही, दगाबाजी केल्याचा आरोप

अक्षय कपिल शर्माच्या शो मध्ये कधी जाणार याचीसुद्धा चाहते वाट बघत होते. मात्र समजलेल्या माहितीनुसार बच्चन पांडेच्या प्रमोशनसाठी तरी तो आता कपिल शर्माच्या शोमध्ये जाणार नाही हे पक्कं झाले आहे.

कपिल-अक्षयच्या दोस्तीत कुस्ती; 'बच्चन पांडे'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार कपिल शोमध्ये जाणार नाही, दगाबाजी केल्याचा आरोप
| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 10:52 PM
Share

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची अक्षय कुमार (Akshay Kumar) यांनी मुलाखत घेतल्यानंतर त्या मुलाखतीची (Interview) जोरदार चर्चा झाली होती. त्या मुलाखतीवर अक्षय कुमारकडून हास्यास्पद टिप्पणी केली होती. त्यामुळे तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अक्षय प्रचंड नाराज झाला होता. जेव्हा पासून अक्षय कुमारने त्याच्या येणाऱ्या बच्चन पांडे या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. ‘बच्चन पांडे’ चित्रपटाची सगळी टीम आता प्रमोशनच्या तयारीला लागली आहे.

अक्षय कपिल शर्माच्या शो मध्ये कधी जाणार याचीसुद्धा चाहते वाट बघत होते. मात्र समजलेल्या माहितीनुसार बच्चन पांडेच्या प्रमोशनसाठी तरी तो आता कपिल शर्माच्या शोमध्ये जाणार नाही हे पक्कं झाले आहे. त्याचं कारण असंही समजलं आहे की, कपिल शर्मा शोमध्ये एका घडलेल्या घटनेमुळे तो जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मैत्रीत दुरावा आणि आव्हानही

अक्षय कुमार आणि कपिलच्या झालेल्या मागील भेटीमुळे तो नाराज आहे. कपिल आणि अक्षयची चांगली मैत्री आहे., मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये काही गोष्टीवरून मतभेद निर्माण झाले आहेत. त्यांच्या जवळच्या एका मित्राने सांगितले आहे की, मागील वेळी अक्षय कुमार जेव्हा कपिल शो मध्ये गेला तेव्हा त्याने एका प्रसिद्ध राजकीय नेत्याची मुलाखत घेतली होती, त्या गोष्टीवरून त्याने चेष्टामस्करी केली होती. तेव्हा अक्षय त्याला आव्हान दिले की, तू त्या व्यक्तीचं जाहीरपणे नाव सांग.

हा भाग कार्यक्रमामध्ये दाखवू नका

अक्षय कुमारने काही वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीची जोरदार चर्चा झाली होती. त्याच मुलाखतीवर कपिल शर्माने टीका टिप्पणी करून विनोद केला होता. तेव्हा अक्षय कुमारने हा भाग कार्यक्रमामध्ये दाखवू नका असं सांगितले होते. त्यावेळी कपिल आणि चॅनेलने त्याला शब्द दिला होता, मात्र तो भाग इंटरनेटवरून व्हायरल झाला. त्या गोष्टीवरून अक्षय कुमार नाराज झाला त्यामुळे कपिलसह त्या चॅनेल आणि त्याच्या टीमने उल्लंघन केले असल्याचे सांगत त्याचे कार्यक्रमामध्ये येण्याआधी त्या व्हायरल व्हिडिओचे स्पष्टीकरण द्या असे अक्षयने सांगितले आहे.

संबंधित बातम्या

लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला मराठीतले मोठे तारे-सितारे कुठे गायब होते? दबक्या आवाजात कुजबूज सुरु!

VIDEO:’अखरेचा हा तुला दंडवत’ व्हिडिओ व्हायरल,अखरेचा व्हिडिओ असल्याचा नेटिझन्सचा दावा

ती इस्लामिक परंपरा माहितीय का, ज्यावरुन शाहरुख खान वादात सापडलाय? लता दिदींसाठीची ती ‘फुंकर’ नेमकी काय आहे?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.