Kiran Mane | कोणतंही सरकार आलं तरी विरोधात पोस्ट लिहिणारच, तो माझा हक्कच; अभिनेता किरण माने भूमिकेवर ठाम

राजकीय भूमिका घेतली म्हणून अभिनेता किरण माने यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे 'मुलगी झाली हो'च्या प्रोडक्शनवर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

Kiran Mane | कोणतंही सरकार आलं तरी विरोधात पोस्ट लिहिणारच, तो माझा हक्कच; अभिनेता किरण माने भूमिकेवर ठाम
actor kiran mane
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 12:03 PM

सातारा: राजकीय भूमिका घेतली म्हणून अभिनेता किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे ‘मुलगी झाली हो’च्या प्रोडक्शनवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अभिनेता किरण माने यांनीही आपण भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं आहे. कोणतंही सरकार आलं तरी विरोधात पोस्ट लिहिणारच. तो माझा हक्कच आहे, असा निर्धारच किरण माने यांनी बोलून दाखविला आहे.

किरण माने यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधताना आपला निर्धार बोलून दाखवला. मला सांगितलं जातं तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आहात. पण मग मी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत त्यांच्या बाजूनेही पोस्ट लिहिली आहे. ती पोस्ट राज्य सरकारच्या विरोधात आहे. कोणतंही सरकार आलं तरी त्यांच्या विरोधात मी पोस्ट करणारच. तो माझा हक्क आहे. कलाकारांनी राजकारणावर बोलू नये असे काही जण मला सूचवत आहेत. या आधीही अनेक अभिनेते होऊन गेले त्यांनी बरीचशी व्यक्तव्य केली आहेत. भूमिका घेतल्या आहेत. आपण जर या पुढील काळात बोललं नाही तर ही वृत्ती अशीच फोफावत जाणार, असं माने म्हणाले.

त्यात काय चुकलं?

मी कायमच तिरकस शैलीत राजकीय पोस्ट करत असतो. मात्र, काही लोकांना मी जाणीवपूर्वक त्यांच्याबाबत लिहित असल्याचा समज होतो. मी एक पोस्ट केली होती. त्यात आमच्या नाटकाला एक किंवा दोन प्रेक्षक असले तरी हाऊसफुल्ल असल्यासारखं जीव ओतून आम्ही काम करतो, असं मी म्हटलं होतं. त्यात काही मी चुकीचं लिहिलं असं वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं.

म्हणजे त्या पक्षाचा झालो असं नाही

काल ‘मुलगी झाली हो’ शूट सुरू असताना मला हिंदी प्रॉडक्शन्स हाउसमधून फोन आला की तुमच्यावर काहीजण नाराज असल्यामुळे तुम्हाला रिप्लेस केले जात आहे. राजकीय पोस्ट केल्यामुळे एका महिलेने तक्रार केली असल्याची माहिती समजत आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांवर मी वेगवेगळ्या पोस्ट लिहीत असतो. मी एखाद्या नेत्याबाबत चांगली पोस्ट लिहिली म्हणजे मी त्या पक्षाचा झालो असं होत नाही. मी आजवर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार मांडत आलो आहे आणि मांडत राहणार. विद्रोही तुकारामाचे विचार मी मांडत आलो आहे आणि ते मी आजच्या काळाशी जोडतो आहे, असं त्यांनी सांगितलं.

मला विरोध करणारे त्या प्रवृत्तीचे

सत्ताधाऱ्यांना जाब विचारत राहणं हे सजग नागरिकाचं कर्तव्य आहे. आज सत्ता काँग्रेसची असती तरी मी त्यांना जाब विचारला असता. हे सजग नागरिकाचे कर्तव्य आहे. राजकारणावर बोलू नको. राजकारणावर लिहू नको हे बोलणे योग्य नाही. आज सर्व गोष्टीचे दर हे राजकारण ठरवत आहे. या आधीदेखील आम्ही कॉलेजमध्ये असताना राजीव गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या एकांकीका केल्या आहेत. मला विरोध करणारे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला, तुकाराम महाराजांना विरोध करणारे याच प्रवृत्तीचे लोक आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बदनाम करणं हे त्यांचं शस्त्रं

बहुजनांचेच नाहीतर सामान्य लोकांचे जगणे या पुढील काळात अवघड होणार आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत आवाज उठवला नाही तर यापुढील काळात सामान्य व्यक्तीच्या सर्व गोष्टींवर बंधन येतील. कुणी माझ्या पाठीशी उभे राहो अगर न राहो मी एकटाच लढणार. मला ट्रोल केले जात आहे. अश्लील अर्वाच्च भाषा वापरली जात आहे. त्यांना वाटत आहे की मी खचलो आहे. ही विषारी भाषा दिवसेंदिवस वाढत चालली आहे याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे. यापुढील काळात मला बदनाम केलं जाणार आहे. खोटे आरोप करून बदनाम करणे हे त्यांचे मोठे शस्त्र आहे, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Kiran Mane | मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा अभिनेता किरण मानेंना पाठिंबा, दिला महाराष्ट्राच्या वारशाचा दाखला, म्हणाले…

महेश मांजरेकरांचं टेन्शन वाढलं, नवा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात, महिला आयोगाने धाडलं आक्षेपाचं पत्र

महिला आयोगाच्या पत्रानंतर मांजरेकरांची माघार, ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवला

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.