AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiran Mane | मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा अभिनेता किरण मानेंना पाठिंबा, दिला महाराष्ट्राच्या वारशाचा दाखला, म्हणाले…

लोकांकडून माने यांना पाठिंबा मिळत असून सोशल मीडियावर Stand With Kiran Mane ही मोहीम मोठ्या ताकदीने राबवली जात आहे. दरम्यान, राज्यातील बडे मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी किरण माने यांना पाठिंबा दर्शविला आहे.

Kiran Mane | मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा अभिनेता किरण मानेंना पाठिंबा, दिला महाराष्ट्राच्या वारशाचा दाखला, म्हणाले...
JITENDRA AWHAD AND KIRAN MANE
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 7:31 AM
Share

मुंबई : एका मराठी वाहिनीमधील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत भूमिका करणारे अभिनेते किरण माने (Kiaran Mane) यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर राज्यात कला क्षेत्रात गजहब उडाला आहे. लोकांकडून माने यांना पाठिंबा मिळत असून सोशल मीडियावर Stand With Kiran Mane ही मोहीम मोठ्या ताकदीने राबवली जात आहे. दरम्यान, राज्यातील बडे मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी किरण माने यांना पाठिंबा दर्शविला आहे. माने केंद्र सरकारविरोधात (Central Government) लिहतात म्हणून त्यांना हटवलं गेलं. कुणाच्या भाकरीवर टाच आणणं चुकीचं आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. त्यांनी आपली भूमिका ट्विटद्वारे मांडली आहे.

भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही

“या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल. देशपांडे, निळू फुले या कलाकारांनी कधी टीका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला गेला. याद राखा, हा महाराष्ट्र वैचारिक वारसा जोपासतो. स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणाऱ्या किरण माने हा अभिनेता फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मिडीयावर लिहतो. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो, म्हणून अचानक मालिकेतूल काढुन टाकले गेले. तुमच्या विरोधात लिहिले म्हणून तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही,” असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा, किरण मानेंची फेसबुक पोस्ट

दरम्यान, माने यांना मालिकेतून काढून टाकल्यामुळे सोशल मीडयावर वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहे. लोकांनी माने यांना पाठिंबा दर्शवला असून भाजपवर टीका केली जात आहे. तर दुसरीकडे माने यांनी दोन ओळींची फेसबुक पोस्ट टाकत माघार घेणार नाही तर लढत राहीन असं सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी “काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा…गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा,” असे म्हणत मतं व्यक्त करतच राहणार अशी भूमिका घेतली आहे.

इतर बातम्या :

हृतिक रोशनची पूर्व पत्नीसोबत सुझेन खानसोबत प्रेमसंबंध?, अर्सलान म्हणाला, ‘मी तिच्याशी प्रेमानेच बोलणार’

Corona update: ‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडेला कोरोनाची लागण

Corona update: ‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडेला कोरोनाची लागण

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.