AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Idol 12 | परीक्षक विशाल दादलानी पुन्हा ‘इंडियन आयडॉल’मध्ये परतणार नाही? आदित्य नारायणने केला खुलासा

छोट्या पद्यावरचा लोकप्रिय शो ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian idol 12) गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. या सगळ्या चर्चेत शोचा परीक्षक विशाल दादलानीसुद्धा (Vishal Dadlani) या कार्यक्रमातून गायब झाला आहे.

Indian Idol 12 | परीक्षक विशाल दादलानी पुन्हा ‘इंडियन आयडॉल’मध्ये परतणार नाही? आदित्य नारायणने केला खुलासा
इंडियन आयडॉल 12
| Updated on: Jun 01, 2021 | 2:25 PM
Share

मुंबई : छोट्या पद्यावरचा लोकप्रिय शो ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian idol 12) गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. या सगळ्या चर्चेत शोचा परीक्षक विशाल दादलानीसुद्धा (Vishal Dadlani) या कार्यक्रमातून गायब झाला आहे. या शोमध्ये विशाल दादलानीशिवाय आणखी दुसरे परीक्षक अर्थात नेहा कक्कर (Neha kakkar) आणि हिमेश रेशमियादेखील दिसत नाहीयत. सध्या शोमध्ये या तिन्ही परीक्षकांची जागा अनु मलिक आणि मनोज मुंतशिर यांनी घेतली आहे. हे दोघे सध्या शोच्या परीक्षणाची धुरा सांभाळत आहेत (Indian idol 12 Judge Vishal Dadlani take long brake from Show know the real reason).

मात्र, हिमेश येत्या एपिसोडमध्ये पुन्हा दिसणार आहे. तर नेहाच्या परत येण्याच्या बातम्याही आल्या आहेत. पण आता विशाल दादलानी या शोमध्ये दिसणार नाहीय आणि यामागचे मोठे कारणही समोर आले आहे. शोचा होस्ट आदित्य नारायण याने विशाल दादलानी शोमधून का गायब झालाय, याचे कारण सांगितले.

विशाल दादलानी परतणार नाही?

मुंबईतील लॉकडाऊननंतर सध्या दमण येथे इंडियन आयडॉल 12 या शोचे शूटिंग सुरू आहे. मात्र, विशाल दादलानी दमणला शूटसाठी गेलाच नव्हता आणि आता तो शुटिंगवर परतणार देखील नाहीय. खुद्द त्यानेच एका मुलाखतीत सांगितले होते की, लॉकडाऊन संपेपर्यंत तो आता शूटवर येणार नाहीय.

त्याचवेळी याबद्दल आदित्य म्हणाला, ‘विशालने गेल्याच वर्षी लोणावळ्यात नवे घर खरेदी केले आहे. त्याच्या आई वडिलांसोबत तो तिथेच शिफ्ट झाला आहे. त्याला लोणावळ्याहून दमणपर्यंत ड्राईव्ह करत यायचे नव्हते आणि यामुळे त्याच्या आई-वडिलांच्या आरोग्यासही धोका निर्माण होऊ शकतो. तो स्वतःमुळे आपल्या पालकांना धोक्यात टाकू इच्छित नाहीत. मी त्याच्या या मुद्याचे पूर्ण समर्थन करतो. अशावेळी आपण नेहमीच आपल्या मनाचे ऐकले पाहिजे, असे मला वाटते.’(Indian idol 12 Judge Vishal Dadlani take long brake from Show know the real reason)

हिमेश रेशमिया परतणार!

इंडियन आयडॉल 12चे तीनही परीक्षक अर्थात विशाल दादलानी, हिमेश रेशमिया आणि नेहा कक्कर गेल्या काही काळापासून शोमधून गायब होते. त्यांच्या जागी अनु मलिक आणि मनोज या शोमध्ये जजची भूमिका निभावत होते. मात्र आता हिमेश रेशमिया येत्या एपिसोडमध्ये परत येणार आहे, परंतु चाहत्यांना आता विशाल आणि नेहाची प्रतीक्षा आहे.

नेहाने देखील सध्या शोमधून ब्रेक घेतला आहे आणि ती आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. नुकताच तिने आपल्या पालकांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. याशिवाय अलीकडेच तिचे पती रोहनप्रीत सिंग याच्यासह नवे गाणे प्रसिद्ध झाले आहे.

(Indian idol 12 Judge Vishal Dadlani take long brake from Show know the real reason)

हेही वाचा :

Lookalike: स्टाईल आणि फॅशनमध्ये सोनाक्षीपेक्षा कमी नाही तिची कॉपी, न्यूयॉर्कची आहे बेस्ट मेकअप आर्टिस्ट

वरुण धवन-कोहलीसह Money Heist च्या प्रोफेसरचा फोटो, मुंबई पोलिसांच्या ट्वीटमागे कारण काय?

Follow Us
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.