AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray: साबरमतीत तुमचा जो बाप बसलाय त्याला… उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर तोफ डागली, शिवतीर्थावरून खुलं आव्हान!

Uddhav Thackeray Speech News: मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा दसरा मेळावा घेतला आहे. यावेळी त्यांनी भाषणातून सरकारवर टीका केली आहे.

Uddhav Thackeray: साबरमतीत तुमचा जो बाप बसलाय त्याला... उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर तोफ डागली, शिवतीर्थावरून खुलं आव्हान!
| Updated on: Oct 20, 2026 | 8:38 PM
Share

मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या सोहळ्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषण केले आहे. त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. दुष्काळावरही वक्तव्य केले आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. रुसूबाई रूसू गावी जाऊन बसू, असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे. तसेच मोदी शहांनी देशाला छळलं असल्याचे ते म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आजचं दृष्य पाहण्यासारखं आहे. लाल किल्यावर भगवा फडकावायचा आहे. आपली ओळख कुणीही चोरू शकत नाही. आपला भगवा कुणीही चोरू शकत नाही. खुराड्यातील कोंबड्यांसारखं जीवन जगू नका. एकच दिवस जगा पण वाघासारखं जगा. ओल्या दुष्काळात किती शेतकऱ्यांना सरकारने मदत केली? असा सवाल ठाकरेंनी सरकारला विचारला आहे.

ते म्हणाले की, अतिवृष्टीवेळी सर्वात मोठं पॅकेज असं मुख्यमंत्री म्हणाले होते. नमो किसान योजनेचे ३ हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले नाही. शेतकऱ्यांच्या तोंडावर ५ हजार रुपये फेकून मारले. सहलीला पैसे नाहीत म्हणून एका मुलाने आत्महत्या केली. हे सरकार केवळ घोषणा करत आहे. कर्जमाफी जाहीर केली, पण किती जणांना मदत केली? यानंतर त्यांनी टायगर श्रोफवर झालेल्या गोळीबारावरही वक्तव्य केले आहे. यावर बोलताना त्यांनी देवेंद्र फडणविसांना खुलं आव्हान दिलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, बिश्नोई गुजरातच्या तुरुंगात आहे. बिश्नोई साबरमतीमध्ये फाफडा आणि ढोकळा खात आहे. देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंम्मत असेल तर साबरमती जेलमधून इथे आणावं. महाराष्ट्राला शहरी नक्षलवादाचं केंद्र म्हणताना जीभ झडत नाही का? मोदी आणि शहांनी १२ वर्ष देशाला छळलं आहे. आंदोलनाआधी पोलीस नोटीस पाठवत आहेत.  आम्ही रेजीम चेंज करायला उभे आहोत. मुलांना घेऊन आईवडील आंदोलनात उतरले आहेत. मुलांचा आवाज समजून न घेतल्यास परिस्थिती वाईट होईल. तिरंगा रॅली काढणं गुन्हा आहे का? जंतरमंतरवर झेनजी गेले तेव्हा पोलीस त्यांच्यावर तुटून पडले. १३ कोटी नागरिकांच्या मतदानाचा हक्क काढून घेतला आहे. कुणी रस्त्यावर उतरला तर तुम्ही त्याला गुंड ठरवता, असं ठाकरे म्हणाले आहेत.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!