Indian Idol 12 | छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार ‘म्युझिकल रामायण’, मोहम्मद दानिश गाणार हनुमान चालीसा!

Indian Idol 12 | छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार ‘म्युझिकल रामायण’, मोहम्मद दानिश गाणार हनुमान चालीसा!
Indian Idol 12

छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘इंडियन आयडल 12’मध्ये (Indian idol 12) या वीकेंडला ‘रामायण स्पेशल’ एपिसोड दाखवण्यात येणार आहे. राम नवमीनिमित्त इंडियन आयडॉलमध्ये संगीतमय रामलीला अर्थात ‘म्युझिकल रामायण’ दाखवण्यात येणार आहे.

Harshada Bhirvandekar

|

Apr 16, 2021 | 4:32 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘इंडियन आयडॉल 12’मध्ये (Indian idol 12) या वीकेंडला ‘रामायण स्पेशल’ एपिसोड दाखवण्यात येणार आहे. राम नवमीनिमित्त इंडियन आयडॉलमध्ये संगीतमय रामलीला अर्थात ‘म्युझिकल रामायण’ दाखवण्यात येणार आहे. यासाठी भारतातील नामांकित सँड आर्टिस्ट या कार्यक्रमात आपले कौशल्य दाखवणार आहेत. तसेच लेखक मनोज मुन्तशिर रामायणाची कथा सांगणार आहेत (Indian Idol 12 Ram Navmi Special episode md Danish will sing hanuman chalisa).

या विशेष भागात, स्पर्धकांपासून परीक्षकांपर्यंत प्रत्येक जण भक्तिभावाता लीन झालेला दिसून येईल. या शोच्या विशेष भागामध्ये योगगुरू बाबा रामदेवही दिसणार आहेत. संगीतमय रामायण या भागातील स्पर्धक ‘रामायणा’शी संबंधित गाणी जातील. पवनदीपसोबत निहाल, अरुणिता, सायली, दानिश या सर्वांचे जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला या भागात पाहायला मिळतील.

प्रोमो पाहून चाहते उत्सुक

‘इंडियन आयडॉल 12’च्या या राम नवमी विशेष एपिसोडचे अनेक प्रोमो व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओंमध्ये वेगवेगळे स्पर्धक आणि लेखक मनोज मुंतशिर आपल्याला दिसत आहेत. याशिवाय अरुणिता आणि निहाल यांच्या गाण्याची एक झलकदेखील दाखवण्यात आली आहे. तथापि, प्रत्येकजण ज्याच्या परफॉर्मन्सची वाट पाहत आहेत, तो म्हणजे स्पर्धक मोहम्मद दानिश (Indian Idol 12 Ram Navmi Special episode md Danish will sing hanuman chalisa).

पाहा नवे प्रोमो

(Indian Idol 12 Ram Navmi Special episode md Danish will sing hanuman chalisa)

दानिश गाणार हनुमान चालीसा

शोच्या प्रोमोमध्ये मोहम्मद दानिश हनुमान चालीसा एका जबरदस्त शैलीत गाताना दिसू शकतो. दानिशने आपल्या भारदस्त आणि जबरदस्त आवाजाच्या जादूने सर्वांची मने जिंकली आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकजण हा भाग टीव्हीवर येण्याची वाट पाहत आहे.

पाहा दानिशच्या परफॉर्मन्सची झलक

‘इंडियन आयडॉल 12’मध्ये प्रत्येक आठवड्यात एक विशेष भाग दाखवला जात आहे. या शोमध्ये नीतू कपूर, रेखा, जीतेंद्र, एकता कपूर आणि इतर बॉलिवूड स्टार्स आतापर्यंत पाहुण्यांच्या भूमिकेत दिसले आहेत. शोचे स्पर्धकही लोकांमध्ये खूप प्रसिद्ध झाले आहेत.

या वेळी ‘इंडियन आयडॉल 12’च्या मंचावर असे काहीतरी केले जात आहे, जे यापूर्वी कधीही झाले नव्हते. या भागाबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्साह आणि उत्सुकता आहे. कार्यक्रमाची परीक्षक नेहा कक्कर हिने देखील आपल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, म्युझिकल रामलीला ऐकण्यासाठी आत ती खूप उत्सुक आहे.

(Indian Idol 12 Ram Navmi Special episode md Danish will sing hanuman chalisa)

हेही वाचा :

Video | सलमानसाठी सलमानचा फोन आणि थेट बॉलीवुडचं तिकिट, सलमानची स्टोरी ऐका खुद्द सलमान खानकडून

इंडियन आयडॉलवरही कोरोनाचं संकट, पवनदीपनंतर आता आशिष कुलकर्णी पॉजिटीव्ह, शोचं काय होणार?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें