Video | सलमानसाठी सलमानचा फोन आणि थेट बॉलीवुडचं तिकिट, सलमानची स्टोरी ऐका खुद्द सलमान खानकडून

‘इंडियन आयडॉल’च्या मागील पर्वाचा विजेता सलमान अली (Salman Ali) याने भाईजानची ही आठवण सांगितली आहे. या दरम्यान त्यांनी दिवंगत संगीतकार वाजीद खान यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:50 PM, 16 Apr 2021
Video | सलमानसाठी सलमानचा फोन आणि थेट बॉलीवुडचं तिकिट, सलमानची स्टोरी ऐका खुद्द सलमान खानकडून
सलमान खान आणि सलमान अली

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा नव्या कलागुणांना संधी देणारा अभिनेता म्हणून देखील ओळखला जातो. ऐश्वर्या राय (Aishwarya rai), कतरिना कैफ (Katrina Kaif), जॅकलीन फर्नांडीस, पुलकित सम्राट अशा अनेक कलाकारांना सलमाननी मनोरंजन विश्वाची ओळख करून दिली. घराणेशाही मागे न जाता, त्याने अनेक नवीन कलाकारांना संधी देण्याचा निर्णय घेतला. ‘भाईजान’ सलमान त्याच्या याच स्वभावामुळे खूप लोकप्रिय आहे. नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान अशाच एका गायकाने आपल्या गायन यशाचं श्रेय सलमान खान याला दिलं आहे (Singer Salman Ali say thank you to salman khan for giving opportunity as singer).

‘इंडियन आयडॉल’च्या मागील पर्वाचा विजेता सलमान अली (Salman Ali) याने भाईजानची ही आठवण सांगितली आहे. या दरम्यान त्यांनी दिवंगत संगीतकार वाजीद खान यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला. सलमान अली म्हणतो कि सलमान खान माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. कारण, माझ्या आयुष्यातील सगळ्यात पहिली संधी मला त्यांनी दिली.

बॉलिवूडमध्ये पहिलं गाणं सलमान खान साठी गायलं!

सलमान अली ‘भाईजान’ विषयी सांगताना म्हणतो, ‘माझ्या आयुष्यातलं पहिलं गाण मी सलमान खान यांच्यासाठी गायलं. ‘दबंग 3’साठी मी हे गाणं गायलं होता. संगीतकार वाजीद खान यांचा मला फोन आलेला, की सलमानसाठी गाण गाशील का? त्यावेळी मी एका शूटमध्ये होतो. हा फोन ठेवताचक्षणी मी शूट सोडलं, तिथल्या स्पॉटबॉयची गाडी घेतली आणि धडक निघालो. बाहेर खूप पाऊस होता, पण मी काही वेळातच त्या स्टुडीओमध्ये पोहोचलो. पुढल्या 15 मिनिटांत ते गाणं रेकॉर्ड केलं.’(Singer Salman Ali say thank you to salman khan for giving opportunity as singer)

कशी मिळाली संधी?

आपल्या याबाबत कशी विचारणा झाली याची कल्पना खुद्द सलमान अलीला देखील नव्हती. त्यानंतर यामागची रंजक कथा स्वतः सलमान खानने सांगितली. सलमान म्हणाला, ‘माझी अम्मी तो कार्यक्रम बघायची ज्यात सलमान अली गाणं गायचा. मी देखील त्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. अम्मी तुझी खूप मोठी फॅन आहे. अम्मी मला म्हणाली की, सलमान या मुलासाठी काही तरी संधी बघ. खूप छान गातो, त्याचं नावही सलमान आहे. मग, माझ्याकडून ही गोष्ट वाजीदकडे गेली आणि वाजीदकडून थेट तुझ्याकडे.’ सलमान खानने ही गोष्ट सांगताच सलमान आणि उपस्थितांनी साश्रू डोळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

वाजीदच्या आठवणींना उजाळा

काही महिन्यांपूर्वी गायक-संगीतकार वाजीद खान यांचं निधन झालं. वाजीद खान यांनी सलमानसाठी खूप गाणी तयार केली आणि गायली देखील! त्यामुळेच ते नेहमी सलमानच्या जवळच्या खास व्यक्तींपैकी एक होते. यानंतर सलमान अलीने देखील ही अमुल्य संधी आपल्याला दिल्याबद्दल वाजीद खान यांचे आभार मानले. यावेळी मंचावर वाजीद खान याचे बंधू संगीतकार साजिद खानदेखील उपस्थित होते.

पाहा व्हिडीओ :

(Singer Salman Ali say thank you to salman khan for giving opportunity as singer)

हेही वाचा :

इंडियन आयडॉलवरही कोरोनाचं संकट, पवनदीपनंतर आता आशिष कुलकर्णी पॉजिटीव्ह, शोचं काय होणार?

तुला फक्त एकदा पाहायचंय, दहा वर्षांपूर्वी गमावलेल्या लेकीच्या आठवणींनी गायिका चित्रा हळहळल्या