तुला फक्त एकदा पाहायचंय, दहा वर्षांपूर्वी गमावलेल्या लेकीच्या आठवणींनी गायिका चित्रा हळहळल्या

नंदनाच्या दहाव्या स्मृतिदिनी चित्रा यांनी भावनिक पोस्ट शेअर करत आठवणींना उजाळा दिला. (Singer KS Chithra daughter Nandana)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:56 PM, 16 Apr 2021
तुला फक्त एकदा पाहायचंय, दहा वर्षांपूर्वी गमावलेल्या लेकीच्या आठवणींनी गायिका चित्रा हळहळल्या
गायिका चित्रा यांची कन्या नंदना

मुंबई : कहना ही क्या ये नैन अंजान से जो मिले, ये हसीन वादिया ये खुला आसमां यासारख्या असंख्य हिंदी आणि दाक्षिणात्य गाण्यांनी रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या आवाजाच्या मागे एक दुःख दडलेलं आहे. विविध भाषांमध्ये जवळपास 25 हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केलेल्या सुप्रसिद्ध गायिका के एस चित्रा (KS Chitra) यांनी दहा वर्षांपूर्वी आपली चिमुकली गमावली होती. नंदनाच्या दहाव्या स्मृतिदिनी चित्रा यांनी भावनिक पोस्ट शेअर करत आठवणींना उजाळा दिला. (Renowned Playback Singer KS Chithra pens emotional note remembering her late daughter Nandana)

चित्रा यांनी काय लिहिलंय?

“तुझं आयुष्य आमच्यासाठी आशीर्वाद होता. तुझ्या आठवणी म्हणजे आमच्यासाठी खजिना आहेत. तुझ्यावर आमचं शब्दांपलिकडे प्रेम आहे. आमच्या अंत:करणात कोरलेल्या तुझ्या आठवणी चिरंतर राहतील. आमची इच्छा आहे की, आम्हाला तुला निदान एकदा तरी पाहता येऊदे, मग तो एक दृष्टीक्षेप असला तरी चालेल. तू आमच्यासाठी किती महत्त्वाची आहेस हे सांगता यावं. तुझी आठवण येते प्रिये…” अशा शब्दात चित्रा यांनी फेसबुकवरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

पाहा फेसबुक पोस्ट

Your life was blessing for us
Your memories are treasures
You are loved beyond words
Your memory engraved in our Hearts…

Posted by K S Chithra on Tuesday, 13 April 2021

नंदनाचा वयाच्या नवव्या वर्षी मृत्यू

57 वर्षीय चित्रा यांची कन्या नंदना हिचा दहा वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. स्विमिंग पूलमध्ये बुडून वयाच्या नवव्या वर्षी नंदनाचा करुण अंत झाला होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा अपघात घडला त्यावेळी चित्रा दुबई संगीतकार ए आर रहमान यांच्या कॉन्सर्टमध्ये गात होत्या. चित्रा दरवर्षी आपल्या लेकीच्या जन्मदिनी आणि स्मृतिदिनी तिच्या आठवणी जागवतात. (Singer KS Chithra daughter Nandana)

चित्रा यांची प्रदीर्घ कारकीर्द

1979 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी चित्रा यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली. आतापर्यंत विविध भाषांमध्ये जवळपास 25 हजारांहून अधिक गाणी त्यांनी रेकॉर्ड केली आहेत. नंदनम या मल्ल्याळी चित्रपटाच्या नावावरुन चित्रा यांनी आपल्या बाळाचे नामकरण केले होते. त्यावेळी केरळ राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार चित्रा यांना मिळाला होता. दक्षिण भारताची गानकोकीळा अशी चित्रा यांची ओळख आहे. 2005 मध्ये केंद्र सरकारने त्यांचा पद्मश्रीने गौरव केला होता. तर याच वर्षी त्यांच्या कारकीर्दीचा पद्मभूषणने सन्मान करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

ना शववाहिनी मिळाली, ना मदत, माऊलीच्या पार्थिवासह कार चालवत मुलगी स्मशानभूमीत

(Renowned Playback Singer KS Chithra pens emotional note remembering her late daughter Nandana)