AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Janmashtami 2021 | ‘या’ टीव्ही स्टार्सनी पडद्यावर निभावली ‘श्री कृष्णा’ची भूमिका, चाहत्यांकडून मिळाले प्रचंड प्रेम!

आज (30 ऑगस्ट) देशभरात कृष्ण जन्मोत्सव (Janmashtami 2021 ) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भाविक जन्माष्टमीचा सण पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने साजरा करत आहेत. 30 ऑगस्ट म्हणजेच आज हा पवित्र सण केवळ देशातच नाही, तर परदेशातही साजरा केला जात आहे. प्रत्येक भक्त वेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णाची पूजा करतो.

Janmashtami 2021 | ‘या’ टीव्ही स्टार्सनी पडद्यावर निभावली ‘श्री कृष्णा’ची भूमिका, चाहत्यांकडून मिळाले प्रचंड प्रेम!
छोट्या पडद्यावरील श्री कृष्ण
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 12:39 PM
Share

मुंबई : आज (30 ऑगस्ट) देशभरात कृष्ण जन्मोत्सव (Janmashtami 2021 ) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भाविक जन्माष्टमीचा सण पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने साजरा करत आहेत. 30 ऑगस्ट म्हणजेच आज हा पवित्र सण केवळ देशातच नाही, तर परदेशातही साजरा केला जात आहे. प्रत्येक भक्त वेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णाची पूजा करतो.

असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी पडद्यावर भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारली आहे. या कलाकारांनी भूमिका साकारताना प्रत्येकाला देवाच्या महानतेची ओळख करून दिली आहे. श्री कृष्णाचे पात्र पडद्यावर अनेक कलाकारांनी अक्षरशः जगले आहे, त्यानंतर कलाकार देखील प्रसिद्धीच्या झोतात आले. आज, जन्माष्टमीच्या निमित्ताने, आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार्सची ओळख करून देणार आहोत, ज्यांनी पडद्यावर ‘श्री कृष्णा’ची भूमिका लीलया पेलली.

नितीश भारद्वाज

जेव्हा जेव्हा पडद्यावर भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे नाव घेतले जाते, तेव्हा अभिनेते नितीश भारद्वाज यांचे नाव प्रथम डोळ्यासमोर येते. ते बीआर चोप्रा यांच्या शो ‘महाभारत’ मध्ये श्री कृष्ण बनून घरोघरी प्रसिद्ध झाले होते. एवढेच नाही, तर नितीश भगवान विष्णू आणि त्यांचे अनेक अवतार दाखवलेल्या ‘विष्णू पुराण’मध्ये देखील दिसले होते.

सर्वदमन डी बॅनर्जी

रामानंद सागर यांचा प्रसिद्ध शो ‘श्री कृष्णा’ आजही प्रेक्षकांना आठवतो. हा शो प्रेक्षकांना खूप आवडला. या मालिकेत सर्वदमन ‘भगवान श्रीकृष्णा’च्या भूमिकेत दिसले होते.

सौरभ राज जैन

आपल्या हसण्याने चाहत्यांना वेड लावणारा अभिनेता सौरभ जैन याला आपण अशा अनेक शोमध्ये पाहिले आहे. पण आजही सौरभ ‘श्री कृष्ण’ म्हणूनच ओळखला जातो. 2013च्या शो ‘महाभारत’मधील भूमिकेसाठी तो ओळखला जातो.

विशाल करवाल

‘MTV रोडीज’ आणि ‘MTV Splitsvilla’ सारख्या शोमध्ये रसिकांनी विशाल करवालला पाहिले आहे. मात्र, तीन मालिकांमध्ये श्री कृष्णाची भूमिका साकरून तो प्रसिद्ध झाला आहे. या तीन मालिका होत्या ‘द्वारकाधीश-भगवान श्री कृष्ण’, ‘नागार्जुन-एक योद्धा’ आणि ‘परमावतार श्री कृष्ण’.

सुमेध मुदगलकर

सध्या अभिनेता सुमेध मुदगलकर ‘राधाकृष्ण’ शोमध्ये श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसतोय. सुमेध मुदगलकरचे पात्र प्रत्येकाला आवडत आहे. अभिनेत्याने आपल्या अभिव्यक्तीने प्रत्येकाची मने जिंकली आहेत. या मालिकेचे कथानक राधा आणि कृष्णाच्या प्रेमावर आधारित आहे.

(Janmashtami 2021 special TV stars who played the role of ‘Shri Krishna’ on the screen)

हेही वाचा :

 यावेळी ‘बिग बॉस मराठी’ असणार वेगळं! पाहा काय काय असतील घरातील नवे बदल

सर्वात उंचीवर असलेल्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला ‘बेलबॉटम’, आनंद व्यक्त करताना अक्षय कुमार म्हणाला…

‘मी देशमुख कुटुंबाला सोडणार नाही…!’, ऐन लग्नाच्या मुहूर्तावर संजनाचा देशमुख कुटुंबियांना अल्टीमेटम!

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.