Kapil Sharma | रणबीर-आलिया-संजयच नाही, तर कपिल शर्मालाही बसला कोरोनाचा मोठा फटका!

कॉमेडी किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) आपला शो ऑफ एअर गेल्यानंतर आता नेटफ्लिक्ससारख्या आंतरराष्ट्रीय ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्याची तयारी करत आहे.

Kapil Sharma | रणबीर-आलिया-संजयच नाही, तर कपिल शर्मालाही बसला कोरोनाचा मोठा फटका!
कपिल शर्मा

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) आपला शो ऑफ एअर गेल्यानंतर आता नेटफ्लिक्ससारख्या आंतरराष्ट्रीय ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्याची तयारी करत आहे. लवकरच तो आपल्या खास कॉमेडी शोच्या माध्यमातून डिजिटल जगात प्रवेश करणार आहे. आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि खासकरुन मुंबईत वाढत्या कोरोना केसेस प्रकरणामुळे कपिलच्या नव्या शोची शूटिंग आता दुबईमध्ये होणार आहे. हे शूटिंग एप्रिल महिन्यापासून सुरू होईल. यासाठी कपिल लवकरच आपल्या टीमसह दुबईला रवाना होणार आहे (Kapil Sharma new show shooting set shifted to dubai due to corona cases increase in India).

या स्पेशल शोसाठी कपिलने महिनाभरापूर्वी तयारी सुरू केली आहे. तो सतत आपल्या टीमबरोबर स्क्रिप्ट रीडिंग सेशन करत असतो. याचबरोबर कपिल शर्माच्या शोनंतर पाठीत झालेल्या दुखापतीतून तो अद्याप सावरलेला नाही. पुढच्या महिन्यात शोच्या शूटिंगसाठी तो दुबईला रवाना होईल. कपिल शर्माने काही काळापूर्वी आपल्या नेटफ्लिक्स डेब्यूचा टीझर चाहत्यांसह शेअर केला होता, ज्यामुळे त्याचे चाहते खूप उत्साही आहेत.

शो ऑफ एअर गेल्यानंतर कपिलने घेतला ब्रेक

सोनी टीव्हीचा द कपिल शर्मा शो ऑफ एअर गेल्यानंतर कपिलनेही ब्रेक घेतला आहे. पण टीकेएसएसच्या शूटिंगनंतर या शोची उर्वरित टीम त्यांच्या पुढच्या प्रकल्पांमध्ये व्यस्त झाली आहे. कपिल शर्मा यांनी ट्विटरवर सांगितले की, पत्नी गिन्नी चतरथच्या प्रसूतीमुळे त्याने आपल्या शोमधून  काही काळासाठी सुट्टी घेतली आहे. सतत शूटिंग करणाऱ्या कपिलने दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर काही काळ कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतला होता. दरम्यान, कपिल शर्माच्या घरात आणखी एका बळाचा जन्म झाला आहे आणि तो आता एका मुलाचा पिता झाला आहे. मात्र, अद्याप कपिलने आपल्या दुसर्‍या मुलाचे नाव जाहीर केले नाही किंवा त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नाही (Kapil Sharma new show shooting set shifted to dubai due to corona cases increase in India).

नव्या दमाने परत येऊ!

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री भारती सिंहने एका मुलाखतीत या शोबद्दल सांगितले होते की, ‘हो, आम्ही ब्रेकवर आहोत पण काहीतरी नवीन करण्यासाठी! आम्ही ब्रेक घेत आहोत जेणेकरून आम्ही स्वतःस अपग्रेड करू शकू. नवीन पात्रांवर काम करण्यासाठी आमची टीम उत्साहित आहे. येत्या दोन महिन्यांत केवळ एखादाच चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चॅनेलने शोला पुन्हा ब्रेक देण्याचे ठरवले आहे. मात्र, असे नाही की या दोन-तीन महिन्यांच्या विश्रांतीच्या वेळी आम्ही पूर्णपणे सुट्टीवर जाऊ. या काळात आम्ही एक टीम म्हणून नवीन पात्रांवर काम करू आणि अधिक जोमाने परत येऊ. प्रामाणिकपणे, आम्ही सर्व यासाठी उत्साही आहोत.’

(Kapil Sharma new show shooting set shifted to dubai due to corona cases increase in India)

हेही वाचा :

Video | राखी सावंतने धारण केला श्रीदेवीचा नागीण अवतार, ‘हा’ मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हाला येईल हसू…

Published On - 10:58 am, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI