कृष्णा अभिषेकने सोडला The Kapil Sharma Show; जाणून घ्या काय आहे कारण?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 23, 2022 | 10:21 AM

21 ऑगस्ट रोजी कपिल शर्मानेही (Kapil Sharma) त्याचा नवीन लूक शेअर केला होता, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने शोच्या नवीन सीझनचा उल्लेख केला होता. प्रेक्षक गेल्या काही महिन्यांपासून कपिल शर्मा शो पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत आहेत.

कृष्णा अभिषेकने सोडला The Kapil Sharma Show; जाणून घ्या काय आहे कारण?
कृष्णा अभिषेकने सोडला The Kapil Sharma Show
Image Credit source: Tv9

‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) हा भारतीय टेलिव्हिजनचा नंबर वन कॉमेडी शो आहे, जो केवळ देशातच नाही तर परदेशातही लोकांना खूप आवडतो. हा शो पुन्हा एकदा नवीन सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 21 ऑगस्ट रोजी कपिल शर्मानेही (Kapil Sharma) त्याचा नवीन लूक शेअर केला होता, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने शोच्या नवीन सीझनचा उल्लेख केला होता. प्रेक्षक गेल्या काही महिन्यांपासून कपिल शर्मा शो पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. पण या शोमध्ये सपनाची भूमिका साकारणारा सर्वांचा लाडका कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) आता शोमध्ये परतणार नसल्याचं कळतंय. शोच्या या नवीन सीझनमध्ये निर्मात्यांनी अनेक बदल केले आहेत. प्रत्येकजण नव्या अवतारात दिसणार आहे. यावेळी द कपिल शर्मा शोमध्ये काही नवीन पात्रही दिसणार आहेत. तर कृष्णा या शोचा भाग असणार नाही. हा सिझन कधी सुरू होणार, याबाबतची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, भारती सिंगदेखील या सीझनच्या प्रत्येक एपिसोडमध्ये दिसणार नाही. या वृत्ताबाबत भारती सिंगने सांगितलं की, ती काही दिवसांसाठी ब्रेक घेत आहे. ती ‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्प-9 चं सूत्रसंचालनदेखील करत आहे. त्यामुळे ती ‘द कपिल शर्मा शो’मध्ये नियमितपणे येणार नाही. मात्र ठराविक एपिसोड्समध्ये ती झळकणार आहे.

करारच्या समस्येमुळे कृष्णा शो करणार नाही

द कपिल शर्मा शोबद्दल कृष्णा अभिषेकला विचारलं असता त्याने सांगितलं, कराराच्या मुद्द्यामुळे तो हा शो करत नाहीये. कृष्णा अभिषेक हा कपिल शर्मा आणि त्याच्या शोच्या टीमसोबत यूएस टूरवर होता. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात हा शो ऑफ एअर करण्यात आला होता. पण आता शोच्या नव्या सीझनमध्ये कृष्णा झळकणार नसल्याने चाहते नाराज आहेत.

हे सुद्धा वाचा

अक्षय कुमार असेल पहिला पाहुणा

द कपिल शर्मा शोच्या नव्या सिझनचं शूटिंग सुरू झालं आहे. ‘द कपिल शर्मा शो’चं शूटिंग आजपासून मुंबईतील फिल्म सिटीमध्ये सुरू आहे. या सिझनच्या पहिल्या गेस्ट शोमध्ये अक्षय कुमार हजर राहणार असल्याचं समजतंय. अक्षय त्याच्या आगामी ‘कटपुतली’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये हजेरी लावणार आहे. जॅकी भगनानी निर्मित हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर 2 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI