Bigg Boss 14 : ‘बिग बॉस 14’चे विजेतेपद हुकल्यानंतर राहुल वैद्यची प्रतिक्रिया, म्हणाला….

गेल्या 20 आठवड्यांपासून सुरु असलेल्या बिग बॉसच्या 14 चा महाअंतिम सोहळा पार पडला. या भव्य रिअॅलिटी शोची विजेती रुबीना दिलैक झाली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:17 PM, 22 Feb 2021
Bigg Boss 14 : 'बिग बॉस 14'चे विजेतेपद हुकल्यानंतर राहुल वैद्यची प्रतिक्रिया, म्हणाला....

मुंबई : गेल्या 20 आठवड्यांपासून सुरु असलेल्या बिग बॉसच्या 14 (Bigg Boss 14) चा महाअंतिम सोहळा पार पडला. या भव्य रिअॅलिटी शोची विजेती रुबीना दिलैक (Rubina Dilaik) झाली आहे. शेवटच्या क्षणी राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि रुबीना यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळाली. मात्र, रुबीनाला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली. त्यामुळे रुबीना बिग बॉसची विजेती ठरली. ( No regrets about not being the winner of Bigg Boss 14: Rahul Vaidya)

शेवटच्या क्षणी विजय हातून गेल्यानंतर राहुल वैद्यने आपली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल म्हणला की, मी खूप खूश आहे कारण मी बिग बॉसच्या घरात ज्यावेळी दाखल झालो होतो त्यावेळी मी इथंपर्यत पोहचेल असे मला कधी वाटले नव्हते. मी विजेता झालो नाही याचे मला मुळीच दु:ख नाही, मी गेम चांगला खेळला आहे याचे मला समाधान आहे. बिग बॉस 14 चे सीझन संपवून माझ्या घरी आई-वडिल आणि गर्लफ्रेंडसोबत परत जात आहे याचा मला आनंद आहे.

यावेळी राहुलला रूबीनाच्या आणि त्याच्या नात्याबद्दल विचारण्यात आले त्यावेळी राहुल म्हणाला की, बिग बॉसच्या घरात आमच्या दोघांचे भांडणे नेमके कुठून सुरू झाले हेच मुळात आम्हाला दोघांनाही माहिती नाही. परंतू आमच्यामध्ये असलेले वादविवाद आम्ही दोघेही बिग बॉसच्या घरामध्ये सोडून आलो आहोत. आमच्या दोघांमध्ये कुठलेही मतभेद आता राहिलेले नाहीत.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14चा आज महाअंतिम सोहळा, कोण होणार विजेता?, कसा असेल सोहळा; वाचा!

Bigg Boss 14 | निक्की तांबोळी बिग बॉसवर नाराज, वाचा काय झालं!

Bigg Boss 14 | बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार?, जाणून घ्या कुठे आणि कसे पाहाल ग्रँड फिनाले

( No regrets about not being the winner of Bigg Boss 14: Rahul Vaidya)