AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आई कुठे काय करते’ नंतर स्टार प्रवाहवर दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला; 4 वर्षांनंतर ती अभिनेत्री छोट्या पडद्यावर

Star Pravah New Serial : भेटीला येणार लग्नानंतर होईलच प्रेम आणि तू ही रे माझा मितवा या दोन नव्या मल्टीस्टारर मालिका... 'आई कुठे काय करते' मालिकेनंतर आता दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. लवकरच या मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. वाचा सविस्तर....

'आई कुठे काय करते' नंतर स्टार प्रवाहवर दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला; 4 वर्षांनंतर ती अभिनेत्री छोट्या पडद्यावर
दोन नव्या मालिकाImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 04, 2024 | 7:42 AM
Share

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनीने नवनव्या कलाकृती सादर केल्या आहेत. त्यामुळेच स्टार प्रवाहच्या मालिका आणि त्यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. स्टार प्रवाह परिवारात लवकरच नवी मल्टीस्टारर मालिका लग्नानंतर होईलच प्रेम! दाखल होतेय. मालिकेच्या शीर्षकावरुनच मालिकेची गोष्ट काय असेल याचा अंदाज येतो. तू ही रे माझा मितवा ही मालिकादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मृणाल पुन्हा छोट्या पडद्यावर

लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात असं म्हणतात. ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो तीच व्यक्ती आयुष्यभर जोडीदार म्हणून लाभायला नशिब लागतं. मात्र प्रत्येकाच्याच नशिबात हे सुख नसतं. नात्यातल्या या हळुवार धाग्याची गोष्ट म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका. जवळपास ४ वर्षांनंतर मृणाल दुसानिस या मालिकेतून पुनरागमन करणार आहे.

कोण- कोण कलाकार दिसणार?

मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर, अविनाश नारकर, ऋजुता देशमुख, कश्मिरा कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, प्रसन्न केतकर, संयोगिता भावे, आभा वेलणकर, विशाल कुलथे, श्रेयस कदम, स्नेहल चांदवडकर अश्या अनेक दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे. १६ डिसेंबरपासून सायंकाळी ७ वाजता ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

लग्नानंतर होईलच प्रेम प्रमाणे अर्णव आणि ईश्वरीच्या प्रेमाची गोष्ट देखिल भेटीला येणार आहे. मालिकेचं नाव आहे तू ही रे माझा मितवा. या मालिकेतल्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांची प्रेम कहाणी थोडी हटके आहे. एकमेकांच्या प्रेमात ते जितके बुडाले आहेत तितकेच ते एकमेकांचा तिरस्कारही करतात. म्हण्टलं तर एकमेकांशिवाय जगता येत नाही आणि म्हटलं तर एकमेकांसोबत रहाताही येत नाही.

थोडक्यात प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव आणि ईश्वरीची हटके लव्हस्टोरी म्हणजे तू ही रे माझा मितवा ही मालिका. कुन्या राजाची गं तू रानी मालिकेतून घराघरात पोहोचलेली गुंजा म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजीत आमकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतील. तू ही रे माझा मितवा २३ डिसेंबरपासून रात्री १०.३० वाजता भेटीला येणार आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.