AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारक मेहता का उल्टा चश्मा फेम ‘अब्दुल’चा मोठा संघर्ष, 50 रूपयांसाठी केला पहिला अभिनय, आता मुंबईमध्ये आहे तब्बल इतकी संपत्ती

खऱ्या आयुष्यामध्ये अब्दुलचे नाव शरद सांकला (Sharad Sankla) असे असून अब्दुलचे पात्र शरद सांकला एकदम जबरदस्त पध्दतीने साकारतात.

तारक मेहता का उल्टा चश्मा फेम 'अब्दुल'चा मोठा संघर्ष, 50 रूपयांसाठी केला पहिला अभिनय, आता मुंबईमध्ये आहे तब्बल इतकी संपत्ती
| Updated on: Jan 24, 2023 | 2:38 PM
Share

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. घरातील जवळपास सर्वच सदस्यांना ही मालिका आवडते. टप्पू, जेठालाल, तारक मेहता, अय्यर, पोपटलाल, भिडे, माधवी, अब्दुल, अंजली भाभी आणि सर्वांची आवडती दयाबेन हे मालिकेमधील मुख्य पात्र आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दयाबेन मालिकेपासून दूर आहे. दयाबेनचे पात्र दिशा वकानी साकारते. चाहते सतत दयाबेनच्या पुनरागमनाची वाट पाहात आहेत. मालिकेमध्ये अजूनही असे काही कलाकार आहेत, जे सुरूवातीपासूनच मालिकेसोबत जोडलेले आहेत. यापैकी एक म्हणजे मालिकेमधील अब्दुल हा देखील आहे. खऱ्या आयुष्यामध्ये अब्दुलचे नाव शरद सांकला (Sharad Sankla) असे असून अब्दुलचे पात्र शरद सांकला एकदम जबरदस्त पध्दतीने साकारतात. गोकुळधाम सोसायटीमध्ये अब्दुल सर्वांचा आवडता आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेसोबत सुरूवातीपासूनच अब्दुल आहे. फक्त मालिकाच नाहीतर अब्दुल याने बाॅलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका देखील साकारल्या आहेत.

अब्दुल याने जरी बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असले तरीही त्याला खरी ओळख ही तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमधूनच मिळाली आहे. विशेष म्हणजे अब्दुचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.

27 पेक्षाही अधिक काळापासून अब्दुल हा इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. शरद सांकला याने आपल्या करिअरची सुरूवात वंश या चित्रपटापासून केलीये. मात्र, या चित्रपटासाठी त्याला अभिनय करण्यासाठी फक्त ५० रूपये मिळाले होते.

वंश या चित्रपटामध्ये अत्यंत छोटी भूमिका अब्दुलने केली होती. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये छोट्या- मोठ्या भूमिका शरद सांकला याने केल्या. करिअरमध्ये शरद सांकला याने अनेक चढउतार बघितले आहेत.

शरद सांकला याच्या आयुष्यामध्ये एक अत्यंत वाईट वेळ आली होती. इतक्या जास्त चित्रपटांमध्ये काम करूनही शरद सांकला याला तब्बल आठ वर्ष काम मिळत नव्हते. त्याच दरम्यान तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्ये काम करण्याची संधी शरद सांकला याला मिळाली.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका मिळाल्यानंतर अब्दुलचे भाष्यच बदलून गेले. त्यानंतर शरद सांकला याने कधीच मागे वळून बघितले नाही. इतकेच नाहीतर मुंबईमध्ये अब्दुलचे स्वत: चे दोन रेस्टोरेंट देखील आहेत.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.