TMKOC | ‘तारक मेहता…’च्या ‘सुंदरलाल’ला कोरोनाची लागण, अहमदाबादच्या रुग्णालयात केले दाखल!

TMKOC | ‘तारक मेहता...’च्या ‘सुंदरलाल’ला कोरोनाची लागण, अहमदाबादच्या रुग्णालयात केले दाखल!
मयूर वाकाणी

मुंबईतील शूटिंग संपवून मयूर वाकानी अहमदाबादला परतला होता. याच दरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्याला अहमदाबादच्या एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Harshada Bhirvandekar

|

Mar 13, 2021 | 12:18 PM

मुंबई : कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. देशभरातून कोरोनाचे हजारो केसेस समोर येत आहेत. बॉलिवूड आणि टीव्हीवरील अनेक सेलेब्स या कोरोन विषाणूच्या संसर्गाला बळी पडले आहेत. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) त्यानंतर टीव्ही सीरियल ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘सुंदरलाल’ची भूमिका साकारणार्‍या मयूर वाकानी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे (Taarak Mehta Ka ooltah chashmah fame sundarlal actor Mayur Vakani tested corona positive).

मुंबईतील शूटिंग संपवून मयूर वाकानी अहमदाबादला परतला होता. याच दरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्याला अहमदाबादच्या एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तानुसार ‘सुंदरलाल’ म्हणजेच मयूरला दोन दिवसांपासून सतत ताप होता. या स्थितीत त्याला कोणताही धोका स्वीकारायचा नव्हता. जेव्हा त्याला कोरोनाची लक्षणे दिसली तेव्हा त्याने चाचणी करून घेतली. या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला आहे. काही लक्षणे दिसल्यानंतर तो स्वत:हून रुग्णालयात दाखल झाला आहे.

दयाबेनच्या परत येण्याची चाहत्यांना प्रतीक्षा!

मालिकेत ‘दयाबेन’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानी हिने 2017मध्ये या कार्यक्रमाला निरोप दिला होता. 4 वर्षे उलटून गेली, तरीही प्रेक्षक आतुरतेने दया बेन परत येण्याची वाट पाहत आहेत. नुकतीच टीएमकेओसीमध्ये अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुनयना फौजदारने दयाबेन जेठालालच्या जीवनात आणि गोकुळधाम सोसायटीत परत येण्याबद्दल काही खुलासे केले होते (Taarak Mehta Ka ooltah chashmah fame sundarlal actor Mayur Vakani tested corona positive).

दयाबेन परत येण्यावर सुनयना म्हणाली, “कदाचित, मला या प्रश्नाचे उत्तर माहित असते. मी आतापर्यंत दया बेनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वाकाणीला कधी भेटले नाही. पण, मला तिला भेटण्याची तीव्र इच्छा आहे. आतापर्यंत तिच्या शोमध्ये परतण्यावर प्रश्न चिन्ह आहे. आम्हाला अद्याप याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आमच्यापैकी कोणत्याही कलाकारांला याबद्दल माहिती नाही. पण हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे. हे फक्त एका पात्राबद्दल नाही, तर ही या शोची खास गोष्ट आहे.’

दिशा-मयूर भाऊ बहिण!

पडद्यावरील भुमिकेप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही दया आणि सुंदरलाल अर्थात दिशा-मयूर खरेखुरे भाऊ-बहिण आहेत. दिसणे तिच्या प्रेग्नन्सीमुळे शोमधून ब्रेक घेतला होता. तथापि, प्रसूतीच्या सुट्टीनंतर तिने पुन्हा या शोमध्ये सामील होणे अपेक्षित होते, परंतु आजपर्यंत असे घडलेले नाही. काही काळासाठी, दया बेन शोच्या मेकर्सशी पुनरागमन करण्याविषयी बोलत होती, परंतु या चर्चांना अद्याप यश मिळालेले नाही. पण, चाटे दया आणि तिच्या केमिस्ट्रीला खूप मिस करत आहेत.

(Taarak Mehta Ka ooltah chashmah fame sundarlal actor Mayur Vakani tested corona positive)

हेही वाचा :

Aayush Sharma | ‘अंतिम’चे शूट संपवून आयुष शर्मा मालदीवला रवाना, पत्नी आणि मुलांसमवेत धमाल, पाहा फोटो…

Birthday Special | ‘क्रिमिनल सायकॉलॉजी’कडे वळायचं होतं पण अभिनयक्षेत्रात आली हरभजनची पत्नी, वाचा गीता बसराबद्दल…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें