Tejasswi Prakash | करण कुंद्रा याचे नाव ऐकताच तेजस्वी प्रकाश ढसाढसा रडली, चाहत्यांना धक्का, वाचा काय घडले?

टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. तेजस्वी प्रकाश हिचा आणि करण कुंद्रा यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला. अनेकांनी यांच्यावर टिका देखील केली होती.

Tejasswi Prakash | करण कुंद्रा याचे नाव ऐकताच तेजस्वी प्रकाश ढसाढसा रडली, चाहत्यांना धक्का, वाचा काय घडले?
| Updated on: Apr 22, 2023 | 10:06 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हे सतत चर्चेत आहेत. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची लव्ह स्टोरी ही बिग बाॅस 15 मध्ये सुरू झाली. अनेकांनी त्यावेळी आरोप केला की, शोमध्ये राहण्यासाठी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे सर्व नाटक करत आहेत. आता बिग बाॅस (Bigg Boss) संपून बरेच दिवस झाले असतानाही करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे सोबत आहेत. विशेष म्हणजे हे दोघे कायमच स्पाॅट देखील होतात. करण कुंद्रा (Karan Kundrra) याने तेजस्वी प्रकाश हिला तिच्या वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज देखील दिले होते. नागिन मालिकेच्या सेटवरही तेजस्वी हिला घेण्यासाठी करण पोहचतो.

काही दिवसांपूर्वी एका पार्टीमधील करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर या व्हिडीओनंतर अनेकांनी यांना खडेबोल सुनावण्यास सुरूवात केली होती. या व्हिडीओमध्ये थेट कॅमेऱ्यासमोर विचित्र डान्स करत किस घेताना करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे दिसले होते.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा हा व्हिडीओ पाहून त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. सर्वच स्तरातून यांच्यावर टिका केली जात होती. अनेकांनी तर तेजस्वी प्रकाश हिला करण कुंद्रा याला सोडण्याचा सल्ला देखील थेट देऊन टाकला होता. यानंतर आता तेजस्वी प्रकाश हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तेजस्वी प्रकाश ही ढसाढसा रडताना दिसत आहे. करण कुंद्रा याच्याबद्दल सांगताना तेजस्वी प्रकाश रडताना दिसली आणि रडत रडत म्हणाली की, माझ्याकडे खूप चांगला माणूस आहे. तेजस्वी प्रकाश हिला रडताना पाहून करण कुंद्रा हा रडू नकोस म्हणत तिला किस करतो. आता हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओवरून हे स्पष्ट झाले की, तेजस्वी प्रकाश ही करण कुंद्रा याच्यावर किती जास्त प्रेम करते. आता या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच तेजस्वी प्रकाश हिने गोव्यामध्ये एक घर खरेदी केले आहे. फक्त गोवाच नाही तर तेजस्वी प्रकाश हिने थेट दुबईमध्येही आलिशान घर खरेदी केले आहे. बिग बाॅस 15 ची विजेती देखील तेजस्वी प्रकाश ही आहे.