
मुंबई : उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही तिच्या अतरंगी कपड्यांसाठी ओळखली जाते. अनेकदा कपड्यामुळे उर्फी जावेद हिच्यावर टिका देखील केली जाते. मात्र, उर्फी जावेद हिला होणाऱ्या टिकेचा काहीच परिणाम होत नाही. काही दिवसांपूर्वी कपड्यांमुळे एका ब्रोकरने उर्फी जावेद हिला बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर उर्फी जावेद हिने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ब्रोकरला बिहारमधून अटक केली. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद हिने खास फोटोशूट (Photoshoot) केले होते, ज्याचे फोटो तूफान व्हायरल होताना दिसले.
नुकताच उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर गवताच्या ड्रेसमधील काही खास फोटो शेअर केले होते. हे फोटो व्हायरल होताना दिसले. अनेकांना उर्फी जावेद हिचे हे फोटो पाहून धक्का बसला. उर्फी जावेद हिच्या फोटोवर एकाने कमेंट करत म्हटले की, मॅडम बकरीपासून सावधान राहा… नाहीतर तुमची फॅशन राहणार नाही.
नुकताच उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचे काैतुक केले आहे. विशेष म्हणजे थेट एका युजर्सने म्हटले की, जे मलायका अरोरा, करीना कपूर, कतरिना कैफ यांना जे जमले नाही ते उर्फी जावेद हिने करून दाखवले आहे.
या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ही पापाराझी यांनी स्मार्ट वाॅच गिफ्ट देताना दिसत आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचे काैतुक केले आहे. आता उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. नेहमीच कपड्यांमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद यावेळी वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील आहे. उर्फी ही मुळ उत्तर प्रदेशची आहे. अभिनयाची आवड असल्याने उर्फीने कमी वयामध्येच मुंबई गाठली.
अगदी कमी वयामध्ये उर्फी जावेद हिने खास ओळख नक्कीच निर्माण केलीये. अनेकदा उर्फी हिला तिच्या कपड्यांमुळे जीवे मारून बलात्कार करण्याच्या धमक्या देखील मिळतात. कपड्यांमुळे तिच्यावर टीका देखील केली जाते. काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट पोलिसात उर्फी जावेद विरोधात तक्रार दाखल केली होती.