Upasana Singh: अखेर उपासना सिंग यांनी ‘द कपिल शर्मा शो’ सोडण्यामागचं सांगितलं खरं कारण

अभिनेत्री उपासना सिंग यांनी द कपिल शर्मा शोमध्ये बुवाजीची भूमिका साकारली होती. मात्र 2017 मध्येच त्यांनी शो सोडला. बुवाजी हे पात्र प्रेक्षकांच्या लोकप्रिय पात्रांपैकी एक होतं. आता जवळपास पाच वर्षांनंतर त्यांनी शो सोडण्यामारचं कारण सांगितलं आहे.

Upasana Singh: अखेर उपासना सिंग यांनी 'द कपिल शर्मा शो' सोडण्यामागचं सांगितलं खरं कारण
Upasana Singh
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jul 03, 2022 | 2:56 PM

‘द कपिल शर्मा शो’मधील (The Kapil Sharma Show) अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडली. उपासना सिंग (Upasana Singh), सुनील ग्रोवर (Sunil Grover) यांसारखे कलाकार तो शो सोडून गेले, पण त्यांनी साकारलेली पात्रं आजही प्रेक्षकांना खूप आवडतात. अभिनेत्री उपासना सिंग यांनी द कपिल शर्मा शोमध्ये बुवाजीची भूमिका साकारली होती. मात्र 2017 मध्येच त्यांनी शो सोडला. बुवाजी हे पात्र प्रेक्षकांच्या लोकप्रिय पात्रांपैकी एक होतं. आता जवळपास पाच वर्षांनंतर त्यांनी शो सोडण्यामारचं कारण सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या शो विषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. कामातून मजा येत नसल्याने शो सोडल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “पैसा हा काही प्रमाणात महत्त्वाचा आहे, पण एका क्षणानंतर तुमचं समाधान अधिक महत्त्वाचं असतं. मला फक्त अशाच भूमिका करायच्या आहेत ज्या मला छान वाटतील. मी नेहमी माझ्या निर्मात्यांना सांगते की मला अशा भूमिका द्या ज्या प्रत्येकजण करू शकत नाही. मी कपिलचा शो करत होते. तो दोन ते अडीच वर्षे टॉपवर होता. मग एक वेळ अशी आली की मला वाटलं की मला यात फारसं काही करायला मिळत नाहीये. मला चांगले पैसे मिळत होते. मी कपिलला सांगितलं की मला इथे फार काही करायला मिळत नाही, शोच्या सुरुवातीला मी केलेल्या भूमिकेसारखं काहीतरी दे. कारण तेव्हा मला खूप मजा आली. आता मला मजा येत नाहीये.”

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Upasana Singh (@upasnasinghofficial)

“म्हणूनच मी शो सोडला. पैशांचं कारण नव्हतं, मला मानधन खूप चांगलं मिळत होतं, कारण आमचा शो हिट होता. पण तरीही मला समाधान वाटलं नाही म्हणून मी निघून गेले. कपिल आणि मी खूप चांगले मित्र आहोत आणि आम्ही अजूनही संपर्कात आहोत. जेव्हा कधी आम्ही बोलतो तेव्हा मी त्याला सांगते की एखादी चांगली भूमिका असेल तर मला परत कॉल कर. मी प्रत्येक निर्मात्याला हेच सांगते”, असं त्या पुढे म्हणाल्या.

उपासना या लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. मासूम या सायकोलॉजिकल थ्रिलरमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत बोमन ईराणी आणि समारा तिजोरी यांच्या भूमिका आहेत. येत्या 17 जूनपासून ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें