AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urfi Javed: “माझे कपडे आवडत नसतील तर..”; चित्रविचित्र फॅशन सेन्सबद्दल उर्फी जावेदची प्रतिक्रिया

उर्फीने जिजी माँ, ये रिश्ता क्या कहलाता है आणि कसौटी जिंदगी की यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तिला अभिनयासाठी कोणतीही ऑफर मिळत नाहीये.

Urfi Javed: माझे कपडे आवडत नसतील तर..; चित्रविचित्र फॅशन सेन्सबद्दल उर्फी जावेदची प्रतिक्रिया
अभिनेत्री उर्फी जावेदकडे एका व्यक्तीने केली 'डर्टी डिमांड'Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 08, 2022 | 11:07 AM
Share

उर्फी जावेद.. हे नाव गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर सतत चर्चेत असल्याचं पहायला मिळालं. तुम्हाला आवडत असो किंवा नसो, सोशल मीडियावर तुम्ही उर्फीला (Urfi Javed) दुर्लक्ष करू शकत नाही. अत्यंत बोल्ड आणि हटक्या ड्रेसिंग सेन्समुळे ती इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. बिग बॉस ओटीटीमुळे (Bigg Boss OTT) सर्वांत आधी चर्चेत आलेली उर्फी तिच्या कपड्यांमुळेच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. साखळ्या, कागर, पिशव्या, गोणी यांसारख्या वस्तूंपासून ती तिचे कपडे तयार करते आणि त्यावर फोटोशूट करते. चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे (Fashion Sense) तिला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. इन्स्टाग्रामवर तिचे तीन दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्फी ट्रोलिंगवर आणि तिच्या फॅशनवर मोकळेपणे व्यक्त झाली.

“प्रत्येकाला विविध फॅशनचे कपडे घालणं, मेकअप करणं आणि सर्वोत्कृष्ट दिसणं आवडतं. मी जे काही करते, ते मी माझ्यासाठी करते. कारण चांगलं दिसणं कोणाला आवडत नाही? जर माझा एखादा ड्रेस लोकांना आवडत नसेल तर ती त्यांची समस्या आहे. त्यांना मानसिकता बदलण्याची गरज आहे,” असं उर्फी म्हणाली.

कपडे डिझाइन करण्यासाठी एक टीम

फॅशनबद्दल तिने पुढे सांगितलं, “माझ्याकडे एक टीम आहे. आम्ही एकत्र बसतो आणि डिझाइन्सवर चर्चा करतो. ही एक प्रक्रिया आहे आणि ते इतकं सोपं नाही. मला लहानपणापासून ड्रेस अपची खूप आवड आहे. मला नेहमी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं. बाहेर जाण्याआधी मी माझ्या लूकची व्यवस्थित प्लॅनिंग करायचे आणि आताही मला ते करायला आवडतं. मी लहानपणापासून अशीच आहे आणि त्यात काहीही चूक नाही.”

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

ड्रेसिंग सेन्सवर कुटुंबीयांची प्रतिक्रिया

तिच्या फॅशनबद्दल घरच्यांची काय प्रतिक्रिया असते असा प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली, “ते काही बोलत नाहीत. मी लहान नाही आणि मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकते. मी माझ्या पालकांचा आदर करते आणि त्यांच्यावर प्रेमसुद्धा करते, पण मला माझ्यासाठी जे योग्य वाटतं ते मी करते.”

चांगल्या ऑफरची प्रतीक्षा

उर्फीने जिजी माँ, ये रिश्ता क्या कहलाता है आणि कसौटी जिंदगी की यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तिला अभिनयासाठी कोणतीही ऑफर मिळत नाहीये. “मी अभिनेत्री बनण्यासाठी लखनऊहून मुंबईला आले. सध्या मला एक अभिनेत्री म्हणून माझी योग्यता सिद्ध करण्यास मदत करणार्‍या भूमिका मिळत नाहीयेत आणि तशा प्रोजेक्ट्सची वाट पाहण्यास माझी हरकत नाही. मला एक सशक्त व्यक्तिरेखा साकारायची आहे आणि अशा कथेचा एक भाग व्हायचं आहे ज्यामध्ये स्त्रियांसाठी एक चांगला संदेश असेल”, असं उर्फीने सांगितलं.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.