इंटीमेट फोटो व्हायरल होण्याची भीती, लग्न मोडण्याची धास्ती; आत्महत्येपूर्वी वैशालीची मनस्थिती कशी होती?

राहुल वैशालीच्या होणाऱ्या नवऱ्याला तिचे इंटीमेट फोटो दाखवणार होता. तुम्ही जर एखाद्याासोबत रिलेशनशीपमध्ये असाल तर इंटीमेसी सामान्य गोष्ट आहे.

इंटीमेट फोटो व्हायरल होण्याची भीती, लग्न मोडण्याची धास्ती; आत्महत्येपूर्वी वैशालीची मनस्थिती कशी होती?
आत्महत्येपूर्वी वैशालीची मनस्थिती कशी होती?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2022 | 9:24 AM

इंदौर: अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Takkar) गेल्या काही काळापासून डिप्रेशनमध्ये होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी ती सायकॅट्रिस्टची मदत घेत होती. आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी वैशालीची नेमकी मनस्थिती कशी होती याची माहिती तिचा मित्र निशांत सिंग मल्कानी (Nishant Singh Malkani) यांनी दिली आहे. राहुल वैशालीला मुव्ह ऑन करू देत नव्हता. ती डिप्रेशनमध्ये आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्याशी चार दिवस आधी संवाद साधला होता, असं निशांत यांनी सांगितलं.

निशांत मल्कानी यांनी ई टाईम्सशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. वैशाली डिप्रेशनमध्ये होती आणि ती मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेत होती. तिला किती त्रास होत होता आणि ती किती डिप्रेशनमध्ये होती याचा आता मला अंदाज येत आहे, असं निशांतने सांगितलं.

राहुल वैशालीच्या होणाऱ्या नवऱ्याला तिचे इंटीमेट फोटो दाखवणार होता. तुम्ही जर एखाद्याासोबत रिलेशनशीपमध्ये असाल तर इंटीमेसी सामान्य गोष्ट आहे. याचा अर्थ असा नाही की ब्रेकअप झाल्यानंतर या फोटोवरून तुम्ही कुणाला धमकवायला हवं, असं ते म्हणाले.

तिने आत्महत्या करण्याच्या चार दिवस आधी माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. तिने वजन कमी केल्याने मी तिला चिडवायचो. मी पुन्हा रिकव्हर करेल असं ती म्हणायची. लग्नापूर्वी मुंबईत येणार असल्याचंही तिने सांगितलं होतं, अशी माहितीही त्यांनी दिली.

जेव्हा वैशाली आणि राहुलने एकमेकांशी डेट करण्यास सुरुवात केली. तेव्हा राहुल विवाहित नव्हता. या दोघांच्या नात्याशी त्याचे नातेवाईक सहमत नव्हते. त्यामुळे त्यांचा विवाह झाला नाही. मात्र, दिशा सोबत विवाह केल्यानंतर राहुल वैशालीला इमोशनली ब्लॅकमेल करत होता. तिला तो मुव्ह ऑन करू देत नव्हता. तिची कदर करणाऱ्या व्यक्तीशी तिला लग्न करायचं होतं. अशातच तिचं लग्न ठरलं. त्यामुळे ती खूप खूश होती, असंही त्यांनी सांगितलं.