सातारा : राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांच्या एका विधानावर बोलत असतांना राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष (NCP) अजून पंधरा वर्षे सत्तेत येणार नाही असा दावा केला आहे. नुकतेच रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राज्यात जे राजकारण सुरू आहे, ते असेच सुरू राहिले तर लोकशाही टिकणार नाही, त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने पुढे आले पाहिजे असं म्हंटले होते. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी पलटवार केला आहे. जर राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस सत्तेत आली तर लोकशाही टिकली, आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस सत्तेतून बाजूला गेली की लोकशाही धोक्यात आली, पण मला राजे साहेबांना सांगायचं आहे असं म्हणत आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहे. लोकशाही मार्गाने बहुमत सिद्ध केले आहे. लोकशाही मार्गानेच सभापती यांची निवड केली आहे. आपणही विधानपरिषदेचे सभापती होता, आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहेत, असं मंत्री देसाई यांनी म्हंटले आहे.