AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varada Patil: ‘लेक माझी दुर्गा’ मालिकेतून वरदा पाटीलची एग्झिट; ‘ही’ अभिनेत्री घेणार तिची जागा

विशेष म्हणजे अगदी एक दिवसआधीसुद्धा वरदा या मालिकेच्या सेटवरील फोटो पोस्ट करत होती. मग अचानक काय झालं आणि तिने मालिका का सोडली, असे प्रश्न प्रेक्षकांना पडत आहेत. याबद्दल मालिकेतील इतरही कलाकारांनी मौन बाळगलं आहे.

Varada Patil: 'लेक माझी दुर्गा' मालिकेतून वरदा पाटीलची एग्झिट; 'ही' अभिनेत्री घेणार तिची जागा
Varada PatilImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 08, 2022 | 4:22 PM
Share

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘लेक माझी दुर्गा’ (Lek Majhi Durga) या मालिकेतून अभिनेत्री वरदा पाटीलची (Varada Patil) अचानक एग्झिट झाली आहे. यामुळे मालिकेच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. वरदाने ही मालिका अचानक का सोडली असा प्रश्न सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहे. यामागचं कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. वरदाच्या जागी मालिकेच्या निर्मात्यांनी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड केली आहे. अभिनेत्री रश्मी अनपट (Rashmi Anpat) आता मालिकेत दुर्गाची भूमिका साकारताना दिसणार आहे. दुर्गाच्या लूकमधील रश्मीचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत.

‘शेवटी जयसिंग आणि दुर्गाचं लग्न पार पडणार. मनोरमासाठी मोठा धक्का! शुभ विवाह विशेष, पाहा लेक माझी दुर्गा जाणीव “ती”च्या अस्तित्त्वाची, दररोज रात्री. 10.30 वा कलर्स मराठीवर आणि कधीही Voot वर,’ असं कॅप्शन देत हा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोच्या कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी वरदाबाबत प्रश्न विचारले आहेत. विशेष म्हणजे अगदी एक दिवसआधीसुद्धा वरदा या मालिकेच्या सेटवरील फोटो पोस्ट करत होती. मग अचानक काय झालं आणि तिने मालिका का सोडली, असे प्रश्न प्रेक्षकांना पडत आहेत. याबद्दल मालिकेतील इतरही कलाकारांनी मौन बाळगलं आहे.

या मालिकेत अभिनेता स्वप्निल पवार हा जयसिंगची भूमिका साकारतोय. 14 फेब्रुवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेद्वारे आई आणि मुलीच्या नात्यापलीकडे समाजामध्ये घडणाऱ्या, चर्चित आणि अतिशय नाजूक विषयाला एका वेगळ्याच प्रकारे प्रेक्षकांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मालिकेमध्ये दुर्गाच्या भावविश्वात कुठेतरी वडिलांकडून तिला तुच्छ दर्जाची वागणूक मिळते, तर दुसरीकडे आईचं भरभरून प्रेम मिळत आहे. दुर्गाला आईच्या प्रेमापेक्षा तिच्या वडिलांच्या डोळ्यातील आग सलतेय. तिच्या या भावविश्वात तिला स्वत:च्या अस्तित्वासाठी का बरं संघर्ष करावा लागतो आहे, का तिला वडिलांकडून झिडकारल जातं आहे याविषयीची कथा यात प्रेक्षकांना पहायला मिळत आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.