‘ती परत आलीये’, नव्या मालिकेच्या प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

'देवमाणूस' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी एक नवीन गूढ रहस्यमय मालिका 16 ऑगस्ट पासून रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

'ती परत आलीये', नव्या मालिकेच्या प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!
ती परत आलीये
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 1:11 PM

मुंबई : झी मराठीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी एक नवीन गूढ रहस्यमय मालिका 16 ऑगस्ट पासून रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  ‘ती परत आलीये’ (Tee Parat Aaliye) असं या मालिकेचं नाव असणार आहे.

नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. जेष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेते विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत. प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं कि, विजय कदम एका परिसरात गस्त घालत आहेत आणि त्या परिसरामध्ये काही हत्या घडत आहेत. त्यामुळे सावध राहा अशी चेतावणी देताना, ते दिसत आहेत. नक्की ही भानगड काय आहे?  या मालिकेत अजून कोण कलाकार असणार आहेत?  ही सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

या मालिकेचं लेखन ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेचे लेखक स्वप्नील गांगुर्डे यांनीच केलं आहे. त्यामुळे ही मालिका देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवणार यात शंकाच नाही.

पाहा प्रोमो :

रहस्यमय मालिकेत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक!

या मालिकेबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले की, “या मालिकेत एक रहस्यमय भागातील गूढ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इकडे आलेल्या लोकांचं काही रहस्य आहे का? ती परत आलीये म्हणजे नक्की कोण आलीये? या प्रश्नाची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत. एका रहस्यमय मालिकेत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझी भूमिका नक्की काय आहे, हे सगळ्यांना लवकरच कळेल. प्रेक्षक या भूमिकेवर नक्की प्रेम करतील अशी माझी खात्री आहे.”

‘देवमाणूस’ घेणार प्रेक्षकांचा निरोप!

छोट्या पडद्यावर ‘देवमाणूस’ ही मालिका गाजते आहे. सध्या मालिकेत डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंह याची अकरा खुनांच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्याचं दाखवलं आहे. अजितकुमार घरी परतल्यावर डिम्पीसोबत त्याचं लग्न उरकण्याची घाई घरची मंडळी करत आहेत. मात्र मालिका निरोप घेत असल्याने आता कथा वेगाने पुढे सरकणार आहे. पुढच्या महिन्याभरात देवीसिंह या हत्या प्रकरणांमध्ये पुन्हा कसा अडकणार, याचं कथानक दाखवलं जाईल. आणि नंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल.

(Zee Marathi New Serial Tee Parat Aaliye The promo of the new series aroused the curiosity of the audience)

हेही वाचा :

‘राणादा’ला मिळाली ‘अंकिता’ची साथ, नवी जोडी, नवा “डाव”

‘देवमाणूस’मध्ये नवी ठसकेबाज एंट्री, ‘या’ व्यक्तीला पाहून देवीसिंगलाही येणार भोवळ

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.