AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीनंतर 9 वर्षांनी लहान अभिनेत्रीशी दुसरं लग्न करणार 51 वर्षांचा सुपरस्टार? ‘त्या’ एका रीलची जोरदार चर्चा

वयाच्या 51 व्या वर्षी हा साऊथ सुपरस्टार त्याच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान अभिनेत्रीशी दुसरं लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे आरोप केले होते.

निवडणुकीनंतर 9 वर्षांनी लहान अभिनेत्रीशी दुसरं लग्न करणार 51 वर्षांचा सुपरस्टार? 'त्या' एका रीलची जोरदार चर्चा
थलपती विजयImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 22, 2026 | 8:33 AM
Share

साऊथ सुपरस्टार थलपती विजयने चित्रपटांनंतर राजकारणात पाऊल ठेवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. गोष्ट त्याच्या फिल्मी करिअरची असो किंवा राजकारणात पाऊल ठेवण्याची, परंतु तमिळनाडू निवडणुकीच्या काही दिवस आधीच त्याची पत्नी संगीताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यातही तिने विजयवर विवाहबाह्य संबंधाचा आरोप केला आहे. पत्नीच्या या आरोपांनंतर थलपती विजयसोबत अभिनेत्री त्रिशा कृष्णनचं नाव जोडलं जात आहे. अनेकांना या चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं वाटलं होतं. परंतु जेव्हा एका लग्न समारंभात विजय आणि त्रिशा एकाच रंगसंगतीच्या पोशाखात उपस्थिती लावली, तेव्हा मात्र सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आता तमिळनाडू निवडणुकीनंतर हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लग्नाच्या चर्चा कशामुळे?

विवाहित थलपती विजय आणि त्रिशाच्या रोमान्सची चर्चा त्यांच्या ‘लियो’ या चित्रपटानंतर सुरु झाली होती. चित्रपटानंतर सोशल मीडियावरील पोस्ट, सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्नसमारंभात दोघं एकत्र दिसू लागले. विजयप्रमाणेच त्रिशालाही राजकारणाची आवड असल्याने या दोघांची मैत्री आणखी घनिष्ठ होताना दिसली. आता सोशल मीडियावर एक रील व्हायरल होत असून त्यात असा दावा करण्यात आला आहे की तमिळनाडू विधानसभा निवडणुकांनंतर विजय आणि त्रिशा त्यांच्या नात्यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करतील. ही रील नेटकऱ्यांचं लक्ष वेधण्यामागचं मोठं कारण म्हणजे त्रिशाची आई उमा कृष्णन यांनी त्याला लाइक केलं आहे.

त्रिशाच्या आईने लाइक केलेली रील-

एकीकडे थलपती विजयचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे, तर दुसरीकडे 11 वर्षांपूर्वी त्रिशाने तिचा साखरपुडा मोडला होता. 2015 मध्ये तिने चेन्नईतील बिझनेसमन वरुण मनियनशी साखरपुडा केला होता. हे दोघं लग्नबंधनात अडकणार होते, परंतु साखरपुड्याच्या पाच महिन्यांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. एका मुलाखतीत त्रिशाने म्हटलं होतं की, तिला लग्न व्यवस्थेवर विश्वास आहे, परंतु कोणाच्या दबावाखाली येऊन तिला निर्णय घ्यायचा नाही. इतकंच नव्हे तर ज्या व्यक्तीशी लग्न होणार होतं, त्या व्यक्तीने तिच्यावर अभिनयक्षेत्र सोडण्यासाठी दबाव आणला होता, यामुळेच साखरपुडा मोडल्याचा खुलासा तिने केला होता.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?