
Thalapathy Vijay Wife Sangeetha Filed Divorce: साउथ सुपरस्टार थलपती विजय याच्या अडचणीत मोठा वाढ होण्याचं चित्र सध्या दिसत आहे. अभिनेत्याला आगामी ‘जन नायगन’ सिनेमा प्रदर्शनादरम्यान मोठा झटका लागणार आहे. आधीच सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गात अनेक अडचणी येत असताना अभिनेत्याच्या खासगी आयुष्यात देखील मोठं वादळ येणार आहे. विजय याची पत्नी संगिता हिने अभिनेत्यावर गंभीर आरोप करत कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. संगिता हिने विजय याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप केले आहेत. एका अभिनेत्रीसोबत विजय याचं अफेअर असल्याचं संगिता हिने कोर्टात सांगितलं आहे. यामुळे अभिनेत्याच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यात मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
प्रसिद्ध अभिनेता आणि TVK चा प्रमुख विजय याच्यावर बायकोने लग्नाच्या 27 वर्षांनंतर गंभीर आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संगिता हिने चेंगलपट्टू फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. संगिता हिने अभिनेत्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे आणि याचिकेत म्हटलं आहे की, त्याचं दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते. अचानक घटस्फोट दाखल केल्याने विजयच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पण, दक्षिणेतील सुपरस्टारने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Tamil Nadu | Actor & TVK chief Vijay’s wife, Sangeetha, has filed a petition for divorce in the Chengalpattu family court. In her petition, Sangeetha has accused Vijay of having an extramarital relationship (with an actress) and has sought divorce on those grounds.
— ANI (@ANI) February 27, 2026
विजय आणि संगिता यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 25 ऑगस्ट 1999 मध्ये दोघांनी लग्न केलं. दोघांना दोन मुलं देखील आहेत, त्यांच्या मुलांचं नाव संजय असं आहे. संजय याने वडिलांसोबत ‘पिल्म वेट्टईकारन’ काम केलं. तर दुसरीकडे अभिनेत्याची एक मुलगी देखील आहे. तिचं नाव दिव्या आसं आहे… तिने वडिलांसोबत ‘थेरी’ सिनेमात काम केलं.
रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती सुमारे 600 कोटी रुपये आहे. आता, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक नवीन ट्विस्ट आला आहे. लग्नाच्या 27 वर्षांनंतर दोघांच्या नात्यात मोठं वादळ आलं आहे. सांगायचं झालं तर, अलिकडच्या काळात, नागा चैतन्य आणि धनुष सारख्या दक्षिण भारतीय स्टार्सनी लग्नही बऱ्याच काळानंतर घटस्फोट घेतला. आता विजय याच्या प्रकरणात पुढे काय होते ते पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.