AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TVK Vijay : अनवाणी पाय… गुडघ्यावर चालत चर्च गाठलं… सुपरस्टार विजय थलपतीची कठोर प्रार्थना… नेटकरी म्हणाले, दुआ…

थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडू विधानसभा 2026 च्या निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला आहे. याच दरम्यान आता विजय यांचा एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे, ज्यामध्ये ते चर्चमध्ये गुडघे टेकून प्रार्थना करताना दिसलेत. चाहत्यांनी त्यावर विविध कमेंट्स केल्या आहेत.

TVK Vijay : अनवाणी पाय... गुडघ्यावर चालत चर्च गाठलं... सुपरस्टार विजय थलपतीची कठोर प्रार्थना... नेटकरी म्हणाले, दुआ...
थलपती विजय
| Updated on: May 05, 2026 | 1:06 PM
Share

2026 मध्ये झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या निकालांनी राजकारणाला नवा रंग मिळाला आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांतील मतदानानंतर काल मतमोजणी होऊन निकाल लागले. काही अपेक्षित तर काही एकदमच धक्कादायक निकाल समोर आले. तामिळनाडूत जे निकाल लागले, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. 4 मे रोजी निवडणुकीचे निकाल समोर आल्यावर विजय यांच्या टीव्हीके पक्षाने दमदार कामगिरी केली असून तो सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक विजयाची कोणी कल्पनाही केली नव्हती. विजय यांना मिळालेला प्रचंड पाठिंबा पाहून राज्यातील विरोधी पक्ष चकित झाले. तर आपल्या मुलाला जे प्रचंड यश मिळालं त्याने विजयचे आई-वडील खूप खुश आहेत. याच जल्लोषादरम्यान, विजय यांचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते गुडघ्यांवर बसून चर्चकडे चालत जाताना दिसत आहे.

विजय यांना तामिळनाडूत यश

हा व्हिडिओ 2026 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वीचा आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता विजय हे तिरुचिरापल्ली येथील सेंट अँथनी चर्चमध्ये अनवाणी पायांनी गुडघे टेकून प्रार्थना करताना दिसत आहे. हा व्हिडीओ, तो क्षण इंटरनेटवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. तो पाहन काहींनी विजयच्या श्रद्धेचे कौतुक केले, तर काहींनी याला निवडणुकीचा स्टंट म्हटलं होतं. ‘तामिळगा वेत्री कळघम’ (TVK) या पक्षाच्या निवडणुकीतील यशासाठी विजय तेथे प्रार्थना करायला तिथे गेला होता. आता निवडणुकीच्या निकालानंतर आणि अभूतपूर्व यशानंतर हा व्हिडीओ पुन्हा व्हायरला झाला असून अभिनेत्याला त्याच्या प्रार्थनेचं फळ मिळालं, अशा आशयाच्या कमेंट्स आता लोकांनी केल्या आहेत.

थलपती विजय यांनी फक्त चर्चमध्येच प्रार्थना केली नाही, तर ते मंदिरातही गेले होते. शिर्डी येथे जाऊन साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले होते. या धार्मिक भेटींच्या माध्यमातून विजयने सर्व धर्मांबद्दल आपला आदर दाखवून दिला. त्यांनी एका मशिदीलाही भेट दिली.

आई हिंदू, वडील ख्रिश्चन

बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल पण विजय यांचे वडील ख्रिश्चन आणि आई हिंदू आहेत. ते जन्माने रोमन कॅथोलिक आहेत. मात्र, सर्व धर्मांना स्वीकारून त्यांनी लोकांमध्ये एक धर्मनिरपेक्ष प्रतिमा निर्माण केली आहे. विजय यांचं खरं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं आहे. आपल्या मुलाने निवडणूक जिंकल्यानंतर, त्यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांनी तिरुत्तानी मुरुगन मंदिरात विशेष प्रार्थना केली. त्यांच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. आपला मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास त्यांच्या वडिलांनी व्यक्त केला होता.

मात्र, विजय यांच्या यशस्वी राजकीय पदार्पणात त्यांच्या वडिलांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या वडिलांनी विजयच्या चित्रपट कारकिर्दीतही मोठे योगदान दिलं. या अभिनेत्याने आपल्या वडिलांच्या चित्रपटात बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आपल्या यशस्वी विजयाचे श्रेय त्यांनी आई-वडिलांच्या आशीर्वादाला आणि आपल्या राज्यातील लोकांना दिलंय.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं