Video | चक्क ‘या’ अभिनेत्रीने मुंबईच्या रस्त्यावर चाहत्यांसोबत केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले…
बाॅलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या चाहत्यांना खुश करण्यासाठी नेहमीच काहीतरी वेगळे करत असतात. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेते हे नेहमीच आपल्या खासगी आयुष्यात नेमके काय सुरू आहे हे देखील सांगताना दिसतात किंवा आपला डाएटड प्लॅन देखील बऱ्याच वेळा सांगतात.

मुंबई : सोनम बाजवा हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असलेले एक नाव आहे. सोनम बाजवा (Sonam Bajwa) हे पंजाबी चित्रपटांमधील अत्यंत मोठे नाव आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूडमध्ये देखील धमाका करण्यासाठी सोनम बाजवा ही प्रयत्न करताना दिसत आहे. विशेष म्हणजे सोनम बाजवा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सोनम बाजवा ही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. बऱ्याच वेळा सोनम बाजवा ही सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना देखील दिसते. सोनम बाजवा ही सोशल मीडियावर (Social media) बोल्ड फोटो शेअर करताना देखील कायमच दिसते.
नुकताच सोनम बाजवा हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे सोनम बाजवा ही चर्चेत आलीये. विशेष म्हणजे सोनम बाजवा हिचा हा व्हिडीओ मुंबईतील असून मुंबईच्या रस्त्यावर धमाल करताना सोनम बाजवा ही दिसत आहे. चक्क मुंबईच्या रस्त्यावर जबरदस्त असा डान्स करताना सोनम बाजवा ही दिसली आहे.
सोनम बाजवा ही सुरूवातीला रिक्षातून उतरते आणि थेट रस्त्यावर डान्स करण्यास सुरूवात करते. सोनम बाजवा हिला पाहून काही मुली तिला जाॅईन करतात आणि डान्स करण्यास सुरूवात करतात. सोनम बाजवा त्या मुलींसोबत मुंबईच्या रस्त्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. आता सोनम बाजवा हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
View this post on Instagram
सोनम बाजवा हिने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सोनम बाजवा हिचे काैतुक देखील केले आहे. एकाने सोनम बाजवा हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, झकास यार…एकदम भारी डान्स केला आहे. प्रत्येक कलाकाराने असे काहीतरी करून आपल्या चाहत्यांना गिफ्ट द्यायला हवे.
दुसऱ्याने लिहिले की, यार एकच दिल आहे किती वेळा जिंकणार ? तिसऱ्याने लिहिले की, तुझा आजचा हा खास डान्स पाहून माझा दिवस भारी गेलाय. अजून एकाने लिहिले की, बाॅलिवूड स्टारने सोनम बाजवा हिच्याकडून नक्कीच काहीतरी शिकायला हवे. पाहा आपल्या चाहत्यांना खुश करण्यासाठी ही काय करत आहे. एकाने लिहिले की, हिला मला बाॅलिवूडच्या मोठ्या चित्रपटात बघण्याची फार इच्छा आहे.
