
बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे अशा निवड निर्मात्यांमध्ये नाव घेतले जाते जे इतिहासाशी संबंधित घटनांवर चित्रपट तयार करतात. द कश्मीर फाइल्स या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता विवेक अग्निहोत्रीचा ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट चार दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सुरुवातीला या चित्रपटाने हवी तशी कमाई केलेली नाही. आता चित्रपटाच्या कमाईत आणखी घट झाल्याचे चित्र आहे. चला जाणून घेऊया चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाई किती झाली आहे…
‘द बंगाल फाइल्स’ हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेच राहिलेला, बहुप्रतीक्षित आणि वादग्रस्त चित्रपटांपैकी एक मानला जातो. ज्या प्रकारे चित्रपटाची चर्चा सुरु होती त्यावरुन चित्रपट चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र तसे झाले नाही. पहिल्या दिवसापासूनच चित्रपट बॉक्स ऑफिसवर जलवा दाखवू शकला नाही. मात्र, सोमवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे दिसले.
वाचा: महागुरूंच्या तुफान ट्रोलिंगवर लेकीने शेवटी मन मोकळं केलं, म्हणाली शेवटी माझ्या बाबांना…
‘द बंगाल फाइल्स’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
पहिल्या दिवशी ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटाने 1.75 कोटींची कमाई (The Bengal Files Collection Day 4) केली. त्यानंतर वीकेंडला दोन्ही दिवस कमाईचा आकडा 2 कोटींच्या पुढे गेला. मात्र, सोमवारी चित्रपटाच्या कमाईत हवी तशी वाढ दिसली नाही. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने सोमवारी केवळ 1.10 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत एकूण 7.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘द बंगाल फाइल्स’ सिनेमाविषयी
‘बंगाल फाइल्स’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, पश्चिम बंगालमध्ये याला विरोध झाला होता. या चित्रपटाला पहिल्या आठवड्यात 250 पेक्षा कमी स्क्रीनिंग मिळाल्या. यामुळे कदाचित चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकत नाही. तसेच या चित्रपटासोबत बागी ४ आणि कॉन्जूरिंग ४ हा चित्रपट प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. त्यामुळे कदाचित ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटाला चांगलाच फटका बसला आहे.