The Bigg Bull | अभिनय क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना जोरदार चपराक, सोशल मीडियावर होतेय अभिषेक बच्चनची वाहवा!

The Bigg Bull | अभिनय क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना जोरदार चपराक, सोशल मीडियावर होतेय अभिषेक बच्चनची वाहवा!
अभिषेक बच्चन

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याच्या ‘द बिग बुल’ (The Big Bull) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपली असून, डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Harshada Bhirvandekar

|

Apr 09, 2021 | 1:37 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याच्या ‘द बिग बुल’ (The Big Bull) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपली असून, डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हर्षद मेहता (Harshad Mehta) यांनी 1992 मध्ये केलेल्या स्टॉक मार्केट घोटाळ्यावर आधारित आहे. कुकी गुलाटी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाला मिश्रित समीक्षा मिळाली आहेत. काही लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे, तर काही लोक अभिषेकच्या अभिनयाच्या कौशल्यावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अभिषेक बच्चन यांनी योग्य उत्तर देऊन अशाच एका व्यक्तीला गप्प केले आहे (The Bigg Bull Abishek bachchan gives sarcastic reply to trollers on social media).

एका वापरकर्त्याने लिहिले, ‘अभिषेक बच्चनने नेहमीप्रमाणेच तुम्हाला थर्ड-रेट अभिनय, खराब स्क्रिप्ट आणि निरुपयोगी चित्रपटाने निराश केले नाही. ‘स्कॅम 1992’ यापेक्षा खूप चांगला होता.’ अभिषेक बच्चन यांनी वापरकर्त्याच्या या टिप्पणीला एक मजेदार उत्तर दिले आहे. या ट्विटला उत्तर देताना अभिषेक म्हणतो, ‘अरे माणसा! मी तुम्हाला निराश केले नाही म्हणून मला खूप आनंद झाला आहे. चित्रपट पाहण्यासाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.’

पाहा अभिषेकचे ट्विट

अभिषेकच्या अभिनयाचे कौतुक!

अभिषेक बच्चन यांच्या ‘द बिग बुल’ या चित्रपटाची तुलना वेब सीरिज ‘स्कॅम 1992’सह केली जात आहे. पण या चित्रपटातील अभिषेकचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. अभिषेकने आपल्या दमदार अभिनयाने त्याच्या ‘गुरु’ चित्रपटाची आठवण करून दिली, असे मत चाहते व्यक्त करत आहेत (The Bigg Bull Abishek bachchan gives sarcastic reply to trollers on social media).

बाप-लेकाची टक्कर टळली!

अभिषेक बच्चन याचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार होता, तर तेव्हाच त्याचे वडील अमिताभ बच्चन यांचा चित्रपट ‘चेहरे’ 9 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. प्रथमच असे झाले असेल, जेव्हा वडील-मुलाच्या चित्रपटामध्ये टक्कर झाली असतो. परंतु, तसे होऊ शकले नाही. ‘चेहरे’चे रिलीज सध्या पुढे ढकलण्यात आले आहे. बर्‍याच शहरांमधील कोरोनाचे वाढते प्रकरण आणि लॉकडाऊन पाहता चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्यात आली आहे. कदाचित ‘चेहरे’चे निर्मातेदेखील आता ओटीटी प्लॅटफॉर्मकडे जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अशी आहे ‘बिग बुल’ चित्रपटाची कथा

‘द बिग बुल’मध्ये अभिषेक बच्चनसोबत अभिनेत्री निकिता दत्ता आणि इलियाना डिक्रूझ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हर्षद मेहता यांनी शेअर बाजारामध्ये केलेल्या घोटाळ्याबद्दल या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. अनेक गुन्हे केल्यानंतर त्याला अटकही झाली होती. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण आणि आनंद पंडित यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

(The Bigg Bull Abishek bachchan gives sarcastic reply to trollers on social media)

हेही वाचा :

Video | पहिल्यांदाच मातृत्व सुख अनुभवणाऱ्या दिया मिर्झानेही आरोग्यासाठी अवलंबला करीना-अनुष्काचा मार्ग, पाहा खास व्हिडीओ…

Happy Birthday Jaya Bachchan | हरिवंशराय बच्चन यांच्या एका अटीमुळे झाले जया-अमिताभचे लग्न, वाचा किस्सा…

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें