AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Jaya Bachchan | हरिवंशराय बच्चन यांच्या एका अटीमुळे झाले जया-अमिताभचे लग्न, वाचा किस्सा…

‘गुड्डी’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि जया यांची भेट झाली होती. या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

Happy Birthday Jaya Bachchan | हरिवंशराय बच्चन यांच्या एका अटीमुळे झाले जया-अमिताभचे लग्न, वाचा किस्सा...
जया आणि अमिताभ बच्चन
| Updated on: Apr 09, 2021 | 10:54 AM
Share

मुंबई : लग्नानंतर जया बच्चन (Jaya Bachchan) बनलेल्या अभिनेत्री जया भादुरी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहेत. सत्यजित रे आणि हृषिकेश मुखर्जी यासारख्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी त्यांच्यातील अभिनयाची प्रतिभा ओळखली होती. चित्रपटसृष्टीबरोबरच राजकारणातही नाव कमवणाऱ्या अशा मोजक्या कलाकारांपैकी जया बच्चन एक आहेत. चित्रपटांमध्ये सक्रिय असताना त्यांनी तीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि तीन सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारांसह नऊ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत लग्न गाठ बांधून त्यांनी बच्चन कुटुंबात प्रवेश केला. मात्र, हरिवंशराय बच्चन यांच्या एका अटीमुळे हे लग्न पार पडले होते (Happy Birthday Jaya Bachchan interesting story behind Jaya and Amitabh Bachchan marriage).

जया यांनी 3 जून 1973 रोजी अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केले. ‘बाबूजीं’च्या एका अटीवर या दोघांचे लग्न झाले होते. चला तर, जया बच्चन यांच्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने हा मनोरंजक किस्सा जाणून घेऊया…

वयाच्या 15व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण

जया बच्चन यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. 1963 मध्ये सत्यजित रे यांचा बंगाली चित्रपट ‘महानगर’मध्ये जया यांनी सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली होती. येथूनच जया यांनी स्वप्न जगण्यास सुरुवात केली. 1971मध्ये ‘गुड्डी’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर अभिनेत्रीने ‘मिली’, ‘चुपके चुपके’, ‘जंजीर’ यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले (Happy Birthday Jaya Bachchan interesting story behind Jaya and Amitabh Bachchan marriage).

असे जुळते सूत

‘गुड्डी’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि जया यांची भेट झाली होती. या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. जया भादुरी आणि राजेश खन्ना एकत्र काम करत असलेल्या ‘बावर्ची’ या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ सतत जया यांना भेटायला जात असत आणि त्यामुळे दोघांचे प्रेम आणखी वाढत गेले.

हरिवंशराय बच्चन यांची अट

मात्र, अमिताभ आणि जया यांचे लग्न अचानक झाले होते. ‘जंजीर’ चित्रपटाच्या यशानंतर सर्व मित्र सेलिब्रेशनसाठी लंडनला जाण्याची तयारी करत होते, जया देखील त्यांच्यासोबत लंडनला जाणार होत्या. मात्र, वडील हरिवंशराय बच्चन यांच्या अटीमुळे दोघांनाही त्याच दिवशी लग्न करावे लागले.

खरं तर, लंडनला जाणाऱ्या मित्रपरिवारात जया देखील आहेत, हे जेव्हा हरिवंश राय बच्चन यांना समजले तेव्हा ते म्हणाले की, जया आणि अमिताभ यांना लंडनला एकत्र जायचे असेल तर, दोघांनाही आधी लग्न करावे लागेल. याच कारणास्तव, दोघांनी लंडनला जाण्यापूर्वी 3 जून 1973 रोजी एका साध्या घरगुती सोहळ्यात लग्न केले आणि त्याच दिवशी दोघे हनिमूनसाठी थेट लंडनला रवाना झाले होते.

(Happy Birthday Jaya Bachchan interesting story behind Jaya and Amitabh Bachchan marriage)

हेही वाचा :

Harshaali Malhotra | ‘बजरंगी भाईजान’ची ‘मुन्नी’ आता बनलीय शायर, वाचा तिची मजेशीर शायरी…

‘देवमाणूस’ ज्यापासून प्रेरित, त्या डॉ. संतोष पोळने जिवंतपणी गाडले सहा जणांना

Follow Us
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....