अमिताभ बच्चन यांनी विरानुष्काच्या मुलीवर केलं ट्वीट, घराणेशाहीचा आरोप करत नेटकरी भडकले

सगळ्यात खास म्हणजे टीम इंडियाच्या सर्वच खेळाडू्ंना मुलगी आहे. आणि आता विराट आणि अनुष्कालाही मुलगी झाली आहे. यावर त्यांनी एक खास ट्वीट केलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी विरानुष्काच्या मुलीवर केलं ट्वीट, घराणेशाहीचा आरोप करत नेटकरी भडकले

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरून टीम इंडियाविषयी एक गमतीशीर पोस्ट शेअर केली आहे. पण त्यांनी मारलेला निशाणा अगदी खरा आहे. बिग बींनी सोशल मीडियावर एक एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंच्या मुलींची नावं लिहली आहे. सगळ्यात खास म्हणजे टीम इंडियाच्या सर्वच खेळाडू्ंना मुलगी आहे. आणि आता विराट आणि अनुष्कालाही मुलगी झाली आहे. यावर त्यांनी एक खास ट्वीट केलं आहे. (amitabh bachchan shared anushka sharma virat kohli baby girl post viral news)

अमिताभ बच्चन यांनी केलेल्या ट्वीटमध्ये महेंद्रसिंग धोनी, हरभजन सिंग, नटराजन, उमेश यादव, मोहम्मद शमी, आर. अश्विन, रोहित शर्मा, गौतम गंभीर, सुरेश रैना, ऋद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे या 11 क्रिकेटपटूंच्या नावं लिहली आहेत. यामध्ये असं लिहलं आहे की, भावी महिला क्रिकेट टीम तयार केली जात आहे. तर त्यांनी पुढे लिहलं की, ‘… आणि महेंद्रसिंग यालाही एक मुलगी आहे. ती संघाची कर्णधार असेल का?

खरंतर, अमिताभ बच्चन यांनी ही पोस्ट मनोरंजनासाठी शेअर केली आहे. पण त्यांनी जे लिहलं ते खोटं नाही. आता यावर काही नेटकऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. क्रिकेटमध्येही घराणेशाही आणायची आहे का? असं म्हणत नेटकऱ्यांनी यावर टीका केली आहे. एका नेटकऱ्याने लिहलं की, हा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. इथं महिला किंवा पुरुष क्रिकेट संघाची निवड त्यांच्या प्रतिभेनुसार होते. यामध्ये त्यांच्या पालकांची कसलीही भूमिका नसते. त्यामुळे कृपया बॉलिवूडसारखी घराणेशाही आता क्रिकेटमध्ये आणू नका. एका वापरकर्त्याने तर सैफ अली खान, अक्षय कुमार यांच्यासह सर्व स्टार्सच्या मुलांची नावं घेत बॉलीवूडमध्ये असं घडतं असं सांगितलं.

या सगळ्यात बिग बींच्या चाहत्यांनी मात्र त्यांची बाजू घेतली. प्रत्येक वेळी गोष्टीचा चुकीचा अर्थ काढायचा नसतो. हा एक मनोरंजनाचा भाग आहे. असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं. खरंतर, अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासह सगळ्याच विषयांवर सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. वयाच्या 78 व्या वर्षीही त्यांनी लडाखला जाऊन शुटींग केलं. यावर चाहत्यांनी त्यांचं त्यांचं कौतुक केलं आहे. (amitabh bachchan shared anushka sharma virat kohli baby girl post viral news)

संबंधित बातम्या – 

TV9 Exclusive : विरुष्का आणि पापाराझींमध्ये महत्त्वाची डील, विरुष्काकडून लेकीची प्रायव्हसी जपण्याचा प्रयत्न

Caller Tune | महानायकाच्या आवाजातील कोरोना ‘कॉलर ट्यून’ बंद होणार! आता ऐकू येणार लसीकरणाची धून…

(amitabh bachchan shared anushka sharma virat kohli baby girl post viral news)

Published On - 8:01 pm, Thu, 14 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI