AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harshaali Malhotra | ‘बजरंगी भाईजान’ची ‘मुन्नी’ आता बनलीय शायर, वाचा तिची मजेशीर शायरी…

लिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खानचा चित्रपट ‘बजरंगी भाईजान’मुळे प्रसिद्ध झालेली ‘मुन्नी’ म्हणजे बालकलाकार हर्षाली मल्होत्रा (Harshaali Malhotra) सध्याच्या काळात एक नवीन कला शिकली आहे.

Harshaali Malhotra | ‘बजरंगी भाईजान’ची ‘मुन्नी’ आता बनलीय शायर, वाचा तिची मजेशीर शायरी...
हर्षाली मल्होत्रा
| Updated on: Apr 08, 2021 | 4:29 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खानचा चित्रपट ‘बजरंगी भाईजान’मुळे प्रसिद्ध झालेली ‘मुन्नी’ म्हणजे बालकलाकार हर्षाली मल्होत्रा (Harshaali Malhotra) सध्याच्या काळात एक नवीन कला शिकली आहे. ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटानंतर तिने केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. त्यादरम्यान ती माध्यमांच्या चर्चेपासून दूर राहिली आणि काही महिन्यांपूर्वी ती पुन्हा एकदा कॅमेर्‍यासमोर आली आणि अचानक तिच्याबाबतीत चर्चा होऊ लागल्या. ज्यानंतर ती पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आली (Bajrangi Bhaijaan Fame Harshaali Malhotra share shayari post on social media).

कविता आणि चारोळ्यात रमली हर्षली

हर्षालीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट खूप मजेदार आहे, त्यात तिने आपल्या शायराना शैलीत समस्या मांडली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘पहले जाते थे स्कूल तो आता था मजा, अब नहीं जा पाते तो मिल रही सजा…पहले आता था सब समझ, अब है कम आता, कब खुलेगा स्कूल भगवान ही है जानता…’

या ओळींमध्ये तिने शाळेची आठवण येत असल्याविषयी लिहिले आहे. ज्या प्रकारे तिने या ओळी लिहिल्या आहेत, त्या चाहत्यांना खूप आवडल्या आहेत.  या पोस्टला आतापर्यंत 40 हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. ही पोस्ट तिच्या आणि सलमान खानच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.

पाहा हर्षालीची पोस्ट

 (Bajrangi Bhaijaan Fame Harshaali Malhotra share shayari post on social media)

आठवीच्या वर्गात पदोन्नती!

हर्षाली सध्या घरीच आहे. तिने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्ट नुसार ती आता पुढल्या वर्गात अर्थात आठवीत गेली आहे. शाळेत जाण्याची मजा ती मिस करत आहे. तर, शाळा लवकरात लवकर सुरू होण्याची वाट पाहत आहे. कोरोनामुळे, मुलांना पुढील वर्गात प्रवेश दिला जात आहे. अभ्यासाची प्रणाली ऑनलाईन झाली आहे. याचा दोष असा आहे की, मुलांना नव्या शिक्षकांबद्दल जास्त माहिती नसते. हर्षालीनेही आपली हीच व्यथा व्यक्त केली आहे. जुन्या शालेय शिक्षणाचे वातावरण केव्हा पुनर्संचयित होईल? याची चिंता पालकांसह सोबतच मुलेही करत आहेत. मात्र, यावर कोणाकडेही स्पष्ट उत्तर नाही.

5000 मुलांमधून हर्षालीची निवड

सलमानच्या ब्लॉकबस्टर फिल्म ‘बजरंगी भाईजान’ () हर्षाली मल्होत्राला भरपूर प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात, तिने एका पाकिस्तानी मूक मुलीची भूमिका साकारली होती. जी चुकून पाकिस्तानातून भारतात आली आणि बोलण्यास असमर्थ असल्याने इथेच अडकली. सलमानच्या चित्रपटात दिसण्यापूर्वी ती टीव्हीमध्ये छोट्या छोट्या भूमिका करायची. वयाच्या 7व्या वर्षी तिला बजरंगी भाईजानसाठी निवडले गेले, त्यानंतर ती बाल कलाकारांच्या सुपरस्टार्सच्या श्रेणीत आली.

मुंबईतच राहते हर्षाली

हर्षाली मूळची दिल्लीची आहे, पण आता ती मुंबईतह राहते. हर्षाली चित्रपटात झळकल्यानंतर तिचे पालक मुंबईत शिफ्ट झाले. शूटिंग दरम्यान सलमान हर्षालीच्या इतक्या प्रेमात पडला की, त्याने तिला आपली भाची बनवले आणि ती आता सलमानला ‘मामा’ म्हणूनच हाक मारते.

(Bajrangi Bhaijaan Fame Harshaali Malhotra share shayari post on social media)

हेही वाचा :

Kartik Aaryan | ‘मेहनत की कमाई’, कार्तिक आर्यनने वाकून केला Lamborghiniला नमस्कार! पाहा व्हिडीओ…

Video | वारा आला नि ड्रेस उडाला, अभिनेत्री दीपिका झाली ‘Opps Moment’ची शिकार!

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.