AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’ समोर ‘हा’ चित्रपट धुमाकूळ घालतोय, देतोय तगडी टक्कर; अवघ्या तीन दिवसांत इतके बजेट वसूल

'धुरंधर' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा आहे. चित्रपट बक्कळ कमाईही कमावताना दिसत आहे. पण 'धुरंधर'ला तगडी टक्कर द्यायला एक चित्रपट नक्कीच मैदानात आहे. तीन दिवसांपूर्वी रिलीज झालेला हा चित्रपट 'धुरंधर' ला चांगलीच टक्कर देताना दिसत आहे. 3 दिवसात या चित्रपटाने देखील कोटींच्या घरात कमाई केली आहे. कोणता आहे हा चित्रपट माहितीये?

'धुरंधर' समोर 'हा' चित्रपट धुमाकूळ घालतोय, देतोय तगडी टक्कर; अवघ्या तीन दिवसांत इतके बजेट वसूल
The film Akhanda 2 Tandavam is creating a sensation and giving tough competition to DhurandharImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 14, 2025 | 5:27 PM
Share

“धुरंधर” सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करतोय. सर्वत्र फक्त त्याचीच चर्चा आहे. ‘धुरंधर’ बक्कळ कमाईही करताना दिसतो. अक्षय खन्ना असो कि रणवीर सिंग किंवा चित्रपटातील इतर कलाकार असो. सर्वजण चर्चेचा विषय ठरतायत. त्यामुळे इतर कोणत्याच चित्रपटाची इथे चर्चा होणारच नाही अस सर्वांना वाटत असताना एक चित्रपट मात्र ‘धुरंधर’ला तगडी टक्कर देताना दिसत आहे. होय, या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तेही ‘धुरंधर’च्या समोर.

‘धुरंधर’ला तगडी टक्कर देणारा चित्रपट

हा चित्रपट म्हणजे ‘अखंड 2 – तांडवम’. दाक्षिणात्य स्टार नंदमुरी बालकृष्ण यांचा “अखंड 2 – तांडवम” हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 12 डिसेंबर 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला हा चित्रपट सर्वांचे मन जिंकत आहे. दरम्यान, “अखंड 2 – तांडवम” ने देखील बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे आणि चांगली कमाई करत आहे. नंदमुरी बालकृष्ण अभिनीत हा पौराणिक चित्रपट दररोज कोटींची कमाई करताना दिसत आहे. चित्रपट ‘धुरंधर’ला तगडी टक्कर देताना दिसत आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन

एका अहवालानुसार, ‘अखंड 2 – तांडवम’ने बॉक्स ऑफिसवर 22.5 कोटी रुपयांची कमाई केली. तर या चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही 15.6 कोटी रुपये कमावले. आता तिसऱ्या दिवशी म्हणजे 14 डिसेंबर रोजी ‘अखंड 2 – तांडवम’ ने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 6.37 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचा एकूण कलेक्शन आता 44.47 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या चित्रपटाने प्रिव्ह्यूमध्ये 8 कोटी रुपये कमावले, ज्यामुळे एकूण 52.47 कोटी रुपये कमावले

चित्रपटाने 3 दिवसात केले एवढे बजेट वसूल 

कोइमोईच्या अहवालानुसार, ‘अखंड 2 – तांडवम’ चे बजेट 200 कोटी रुपये आहे. भारतात 44.47 कोटी रुपये जमवून, चित्रपटाने त्याच्या बजेटच्या 22.235 टक्के वसूल केले आहे. चित्रपट अजूनही त्याचे बजेट वसूल करण्यापासून दूर आहे, तर चित्रपटाला हिट होण्यासाठी बराच काळ वाट पहावी लागेल. कारण कोणत्याही चित्रपटाला हिट म्हणण्यासाठी त्याच्या बजेटच्या दुप्पट कमाई करावी लागते. अशा परिस्थितीत, ‘अखंड 2 – तांडवम’ ला देखील सुमारे 400 कोटी रुपयांचा व्यवसाय करावा लागतो.

“अखंड” चित्रपटाचा सिक्वेल

“अखंड 2 – तांडवम” हा नंदामुरी बालकृष्णाच्या 2021 मध्ये आलेल्या “अखंड” चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 89 कोटींची कमाई केली. ‘अखंड 2 – तांडवम’ तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. बोयापती सरिनू दिग्दर्शित या चित्रपटात नंदामुरी बालकृष्ण मुख्य भूमिकेत आहेत. संयुक्ता मेनन, आधी पिनिसेट्टी, हर्षाली मल्होत्रा, कबीर दुहान सिंग आणि सास्वता चॅटर्जी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.