The Kashmir Files Collection: ना झूंड, ना पावनखिंड, सलमान, शाहरुखच्या कमाईचा आकडाही गाडणार काश्मीर फाईल्स? किती कोटी कमावणार?

ह्या सगळ्यांच्या तुलनेत फारसा चर्चेत नसलेला काश्मीर फाईल्सनं मात्र बाजी मारलीय. फक्त देशातच हा सिनेमा दीडशे ते दोनशे कोटीचा गल्ला जमवेल असं सुमीत काडेल ह्या फिल्म समिक्षकानं म्हटलंय. शंभर कोटी तर काश्मीर फाईल्स सहज कमावेल असाही सुमीतचा अंदाज आहे

The Kashmir Files Collection: ना झूंड, ना पावनखिंड, सलमान, शाहरुखच्या कमाईचा आकडाही गाडणार काश्मीर फाईल्स? किती कोटी कमावणार?
'द काश्मीर फाइल्स'Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 7:17 AM

बॉलीवुडमध्ये एक आठवडाही किती मोठा आणि निर्णायकी असतो हे तीन फिल्मच्या प्रदर्शनावरुन लक्षात येईल. मराठीतला पावनखिंड (Pawankhind) आला आणि बघता बघता त्यानं चांगली कमाई केली. आता तो अनेक थिएटर्समधून उतरुनही गेला. त्यानंतर नागराज मंजुळेंचा झूंड (Jhund) आला त्याची जोरदार चर्चा झाली. झूंड की पावनखिंड अशीही चर्चा रंगली. ह्या दोन्ही फिल्मच्या कमाईची तुलना होत असतानाच अनुपम खेर, मिथून चक्रवर्तीचा द काश्मीर फाईल्स थिएटरमध्ये धडकला आणि अक्षरश: भूकंप झाला. झूंड बघून अस्वस्थ झालेला प्रेक्षक काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) बघून मात्र संतप्त झालेला पहायला मिळतोय. त्याचा हा संताप एकापासून दुसऱ्या प्रेक्षकापर्यंत पोहोचतोय. परिणामी लोकांनी थिएटरकडे मोर्चा वळवलाय आणि त्याचा परिणाम म्हणून बॉक्स ऑफिसरवरचे कमाईचे आकडे अक्षरश: सुसाट सुटलेत.

काश्मीर फाईल्सची कमाई 1990 च्या काळात काश्मीरमधून पंडीतांना जे पलायन करावं लागलं त्याची गोष्ट काश्मीरी फाईल्समध्ये आहे. तसा हा विषय अनेकांनी विविध लेख लिहून डॉक्युमेंटरी बनवून, पुस्तकं लिहून मांडलाय पण ज्या पद्धतीनं दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रींनी तो हाताळलाय त्याला सध्या तरी तोड नसल्याचं दिसतंय. अर्थातच इतिहासाच्या विविध बाजू असतात. त्यातली एक बाजू घेऊन अग्नीहोत्रींनी द काश्मीर फाईल्स बनवलेला आहे. त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिलाय. फिल्म बिजनस अॅनेलिस्ट तरण आदर्श यांच्या माहितीनुसार आतापर्यंत द काश्मीर फाईल्सनं 27 कोटींचा गल्ला जमवलाय. त्यात

#शुक्रवारी 3.55 कोटी,

#शनिवारी 8.50 कोटी,

#रविवारी 15.10 कोटी

इतका आहे. याचाच अर्थ सोमवारच्या कमाईचे आकडे अजून आलेले नाहीत. द काश्मीर फाईल्सचा कमाईचा आकडा दर दिवशी दुप्पट झालेला दिसतोय म्हणजेच आतापर्यत पन्नास कोटीच्या आसपास हा सिनेमा पोहोचला असण्याची शक्यता आहे. 200 कोटीचा गल्ला पार करणार? आपल्याकडे शाहरुख, सलमान खान, अक्षय कुमार यांचे सिनेमे येणार म्हणजे ते शंभर कोटी जमवणारच असं ठरलेलंच असतं. पण गेल्या काही काळात ते मोडीत निघालंय. बड्या सुपरस्टारच्याही एखाद्या सिनेमाच्या कमाईची आता खात्री देता येत नाही. अमिताभ बच्चन यांच्या झूंडचच उदाहरण बघा. सैराटसारखा तोही तुफान कमाई करेल असा अंदाज व्यक्त केला जात होता पण फिल्मचं बजेटही निघेल की नाही अशी चर्चा आहे. ह्या सगळ्यांच्या तुलनेत फारसा चर्चेत नसलेला काश्मीर फाईल्सनं मात्र बाजी मारलीय. फक्त देशातच हा सिनेमा दीडशे ते दोनशे कोटीचा गल्ला जमवेल असं सुमीत काडेल ह्या फिल्म समिक्षकानं म्हटलंय. शंभर कोटी तर काश्मीर फाईल्स सहज कमावेल असाही सुमीतचा अंदाज आहे. त्यामुळेच कोरोनानंतरचा द काश्मीर फाईल्स हा पहिला सिनेमा असेल जो बंपर कमाई करेल.

हे सुद्धा वाचा:

‘द काश्मीर फाइल्स’ : जन्मापेक्षा मृत्यू अधिक पाहिलेल्या काश्मिरी पंडितांचं कटू सत्य

‘द काश्मीर फाईल्स’ची IMDb रेटिंग अचानक घसरली; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केला संताप

Tv9 Marathi Poll : द काश्मिर फाईल्स, झुंड, की पावनखिंड… कोणत्या चित्रपटाकडे प्रेक्षकांचा सर्वाधिक कल? जाणून घ्या टीव्ही 9 मराठीचा पोल

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.