अदा शर्मा हिच्या एका वक्तव्यामुळे The Kerala Story सिनेमा पुन्हा चर्चेत; प्रसिद्ध सेलिब्रिटींवर साधला निशाणा

खंत व्यक्त करत अभिनेत्री अदा शर्मा हिने साधला बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींवर निशाणा... 'द केरळ स्टोरी' सिनेमाच्या यशानंतर अदा शर्मा असं का म्हणाली?

अदा शर्मा हिच्या एका वक्तव्यामुळे The Kerala Story सिनेमा पुन्हा चर्चेत; प्रसिद्ध सेलिब्रिटींवर साधला निशाणा
| Updated on: Jul 14, 2023 | 3:35 PM

मुंबई | अभिनेत्री अदा शर्मा फेम ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने फक्त भारतातच नाही तर, संपूर्ण देशात धुमाकूळ घातला होता. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी केली. पण सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक ठिकाणी सिनेमाला विरोध करण्यात आला. एवढंच नाही तर, सिनेमा प्रदर्शित केल्यामुळे अनेक चित्रपटगृह मालकांना धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. पण कोणत्याही विरोधाचा आणि वादाचा परिणाम सिनेमावर झाला नाही. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. पण अदा शर्मा हिच्या एका वक्तव्यामुळे सिनेमा पून्हा चर्चेत आला आहे.

अदा शर्मा हिच्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमावर अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि कमल हासन यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींनी सिनेमाला विरोध केल्यानंतर अदा शर्मा हिने मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, अनेकांनी सिनेमाला विरोध केला होता.

‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा विरोध करत कमल हासन म्हणाले, “मी प्रचारकी चित्रपटांच्या विरोधात आहे. चित्रपटाच्या शेवटी फक्त ‘खरी कथा’ असा लोगो लावून चालत नाही. तर कथासुद्धा खरी असावी लागते आणि हा चित्रपट खरा नाही”, अशा शब्दांत त्यांनी सिनेमावर टीका केली.

‘द केरळ स्टोरी’ सिनेमाबद्दल काय म्हणाले होते नसीरुद्दीन शाह?

‘द केरळ स्टोरीसाठी लोक गर्दी करत आहेत. तो चित्रपट मी पाहिला नाही आणि पाहण्याची माझी इच्छाही नाही. कारण त्याबद्दल मी पुरेसं वाचलं आहे” एवढंच नाही तर, सिनेमाच्या यशाला नसीरुद्दीन शाह ‘धोकादायक ट्रेंड’ असं म्हणाले होते. द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या यशानंतर अदा शर्मा हिने मोठं वक्तव्य केलं आहे.

प्रसिद्ध सेलिब्रिटींवर निशाणा साधत अदा शर्मा काय म्हणाली?

‘मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास ठेवते. आपल्या देशात मोकळेपणाने बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. सिनेमा पाहिल्याशिवाय न्याय देणं योग्य नाही. कोणीही कोणाबद्दल देखील बोलू शकतं. हे आपल्या देशाचं सौंदर्य आहे आणि मी माझ्या देशावर प्रचंड प्रेम करते. वेगवेगळ्या विचारांचे लोक देशात राहतात.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींनी सिनेमाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. तरी देखील लोक चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी गेले. कोणी काहीही बोललं तरी सिनेमाचं नुकसान झालं नाही..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.