AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईशा हैराण, थेट या व्यक्तीचे ‘बिग बाॅस 17’मध्ये आगमन, निर्मात्यांची मोठी खेळी

बिग बाॅस 17 धमाका करताना दिसतंय. विशेष म्हणजे बिग बाॅस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. बिग बाॅस 17 मध्ये पुढील काही दिवसांमध्ये मोठे हंगामे होणार हे नक्कीच आहे. प्रेक्षकांचे फुल मनोरंजन होणार हे नक्कीच.

ईशा हैराण, थेट या व्यक्तीचे 'बिग बाॅस 17'मध्ये आगमन, निर्मात्यांची मोठी खेळी
| Updated on: Oct 28, 2023 | 3:23 PM
Share

मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसत आहेत. हे सीजन देखील टीआरपीमध्ये टाॅपला आणण्यासाठी निर्मात्यांनी कंबर कसल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस 17 मध्ये ईशा ही एक वेगळ्या प्रकारे गेम खेळताना दिसत आहे. इतकेच नाही तर गेल्या विकेंडच्या वारला सलमान खान याने तिला खडेबोल सुनावले होते. आता थेट ईशा मालवीय हिच्या करंट बॉयफ्रेंडचे आगमन हे बिग बॉस 17 मध्ये झाले आहे. यामुळे सर्वांनाच मोठा झटका बसलाय.

बिग बॉस 17 कडून निर्मात्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये क्रेझही आहे. बिग बॉस 17 मध्ये मोठे हंगामे पहिल्याच दिवसापासून बघायला मिळत आहेत. बिग बॉस 17 चा दुसरा विकेंडचा वार धमाकेदार झालाय. सलमान खान याने सर्वांनाच मोठा धक्का दिलाय. थेट ईशा हिचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेल हा बिग बॉस 17 मध्ये दाखल झालाय.

समर्थ जुरेल याने बिग बाॅसच्या घरात वाइल्ड कार्ट एंट्री घेतलीये. इतकेच नाही तर समर्थ जुरेल याच्या आगमनानंतर बिग बाॅसच्या घरात मोठी भांडणे झाली. समर्थ याला ईशाने विचारले की, तू काय म्हणून इथे आला आहेस. त्यावर तो थेट म्हणतो की, मी कोण आहे तुझा? त्यावर ईशा म्हणते की, मित्र…हे ऐकून समर्थ हा संतापताना दिसतोय.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

तो थेट म्हणतो की, ही अत्यंत खोटारडी मुलगी आहे. दुसरीकडे अभिषेक हा रडताना दिसतोय. कारण अभिषेक आणि ईशा देखील काही दिवस रिलेशनशिपमध्ये होते. घरातील सर्व सदस्य हे अभिषेक याला सांभाळताना दिसत आहेत. ज्यावेळी ईशाची पोलखोल समर्थ हा करतो, त्यावेळी अभिषेक हा त्याच्या अंगावर मारण्यासाठी गेल्याचे दिसतंय.

अभिषेक आणि समर्थ हे एकमेकांच्या अंगावर मारण्यासाठी गेल्याचे दिसत आहेत. मात्र, आता हे नक्की आहे की, पुढील काही दिवसांमध्ये ईशा हिच्याबद्दल अनेक मोठे खुलासे बिग बाॅसच्या घरात होऊ शकतात. समर्थ याला बिग बाॅसच्या घरात पाहून ईशा हिला जोरदार झटका बसल्याचे तिच्या बोलण्यावरून स्पष्ट दिसत होते. मोठे हंगामे होणार हे नक्की आहे.

Follow Us
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.